घरलाईफस्टाईलHealth Tips : कंबर दुखतेय? करा हे घरगुती उपाय

Health Tips : कंबर दुखतेय? करा हे घरगुती उपाय

Subscribe

कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे कंबरेत वेदना होण्याचा त्रास अनेकांना होतो. खूप वेळ एकाच स्थिती बसल्याने, वाकडे झोपल्याने किंवा थकवा येण्याने कंबर दुखी होऊ शकते. परंतु, शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील कंबरेत वेदना होऊ शकते. यामुळे अनेकदा त्यासाठी डाॅक्टरांकडच्या फेऱ्या वाढतात. पेनकिलर्स घेऊन साईड इफेक्टस होतात. अशा वेळी काही घरगुती उपायही आहेत. काय आहेत उपाय पाहुयात.

खोबरेल तेल

खोबरेल तेलानं मसाज करा. खोबरेल तेल गरम करायचं, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. गरम तेल थंड झालं की त्यानं दुखl असलेल्या भागावर मसाज करायचा. हे केल्याने कंबरीच्या वेदनेपासून आराम मिळू शकते.

- Advertisement -

गरम पाणी

कंबरीची वेदना घालवण्यसाठी गरम पाणी फायदेशीर ठरू शकते. गरम पाण्याने आंघोळ किंवा बाथटबमध्ये गरम पाणी टाकून त्यात काही वेळ बसल्याने वेदनेपासून सुटका मिळू शकतो. तुम्ही कंबरेला गरम पाण्याचा शेक देऊ शकता. मात्र, पाण्याचे तापमान खूप जास्त नसावे, अन्यथा त्वचा भाजू शकते.

हळदीच्या दुधाचे सेवन

हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने कंबरेची वेदना कमी होण्यात मदत होऊ शकते. हळदीमधील अँटी-इन्फ्लेमेटोरी आणि अँटि-ऑक्सिडेंट गुण हाडांच्या वेदनांपासून सुटका देण्यात मदत करू शकतात. एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.

- Advertisement -

कपड्याने द्या शेक

जेव्हा कंबर खूप दुखत असेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून त्यातून निघणाऱ्या वाफेने कंबरेला शेक द्या.

व्यायाम

बसण्याच्या आणि झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या. खांद्याना सरळ ठेवून बसा आणि आवश्यक्तेपेक्षा अधिक झुकू नका. यासह व्यायाम करा, तसेच दीर्घकाळ उभे किंवा बसून राहण्याचे टाळा.

कॅल्शियम आहार

स्त्रियांच्या शरीरात वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची 45 वर्षे ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून गरजेचे आहे की तुमच्या शरीरात शक्य तितका कॅल्शियमचा वापर करावा. शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घ्यावीत. तर असे काही उपाय करून तुम्ही सहज आपल्या कंबरदुखीवर नियंत्रण मिळवू शकता.

हेही वाचा :  भिजवलेले चणे खाण्याचे जबरदस्त फायदे

______________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -