Sunday, May 12, 2024
घरमानिनीमाऊंटन बाईक रायडींगसाठी टिप्स

माऊंटन बाईक रायडींगसाठी टिप्स

Subscribe

जवळजवळ प्रत्येकालाच प्रवास करायला आवडते. त्यामुळे कुणालाही वेळ मिळाला की, तो कुठल्या ना कुठल्या ठिकाणी जातो. जेव्हा कोणी डोंगरावर भेट द्यायला जातो तेव्हा ते नक्कीच काही साहसी उपक्रम करण्याच्या विचार करतात. पर्वतांमध्ये ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगसोबत अनेकांना माऊंटन बाईक चालवायलाही आवडते. पर्वतांमध्ये बाईक चालवणे ही केवळ मजेदार साहसी क्रिया नाही तर हे करताना धोक्याची भीती देखील आहे.

जेव्हा कोणी प्रथमच पर्वतांमध्ये बाईक चालवते तेव्हा काही गोष्टी फॉलो करण्याची गरज असते. जर तुम्हीही पर्वतांना भेट देणार असाल आणि तुम्हाला पहिल्यांदाच पर्वतांच्या मध्यभागी बाईक राईडचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

बाईकची स्थिती तपासा –

जर तुम्ही पहिल्यांदा डोंगराच्या मधोमध बाईक चालविण्याची तयारी करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही बाईकची स्थिती तपासली पाहिजे. जर बाईकची स्थिती चांगली नसेल तर तुम्ही प्रवासाच्या मध्यभागी अडकून पडू शकता आणि तुमच्या अडचणी वाढू शकतात. कुणी डोंगरावर गेल्यावर तिथे भाड्याने बाईक घेतल्याचे अनेकदा दिसून येते. अशा स्थितीत दुचाकीची स्थिती चांगली आहे का नाही हे कळत नाही. अशा परिस्थितीत बाईक भाड्याने घेण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे बाईक चालवा आणि ती नीट तपासा.

- Advertisement -

सेफ्टीकिट घालायला विसरू नका –

बाईकची स्थिती तपासल्यानंतर सेफ्टीकीटची काळजी घेणं आवश्यक आहे. डोंगरात बाईक चालविताना अनेकजण सेफ्टीकिटचा वापर करत नाही आणि नंतर अपघाताला बळी पडल्याचे अनेकदा दिसून येते. जर तुम्ही डोंगरातही सेफ्टीकिट घालून बाईक चालवली तर तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. डोंगरात बाईक चालविण्यापूर्वी हेल्मेट, शूज, हातमोजे, एल्बोगार्ड आणि गुडघा सुरक्षा रक्षक वापरणे आवश्यक आहे.

रोडमॅप तपासा –

बाईकची स्थिती तपासल्यानंतर आणि सेफ्टीकिटकडे लक्ष दिल्यानंतर, रस्त्याच्या नकाशाकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. डोंगरातले रस्ते कधी कधी खूप खराब असतात. जर तुम्हाला दुर्गम भागात माउंटन बाईक राईडचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच रस्ता तपासला पाहिजे. रस्ता नेहमीपेक्षा खराब असेल तर प्रवासाची मज्जा खराब होऊ शकते.

रस्त्याच्या कडेला बाईक चालू नका –

डोंगरात फिरायला किंवा बाईक चालवायला जेवढं चांगलं वाटतं, तेवढीच धोक्याची भीती असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पहिल्यादांच डोंगरात बाईक राईडचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही डोंगराच्या बाजूने बाईक चालविणे टाळले पाहिजे. असे केल्याने एखादी अनुचित घटना घडू शकते.

या टिप्स देखील लक्षात ठेवा –

  1. बर्फवृष्टी आणि पावसाळयात माऊंटन बाईक रायडींग करू नका.
  2. माऊंटन बाईक रायडींग दरम्यान, काही आवश्यक औषधें सोबत अवश्य ठेवा.

 

 

 


हेही वाचा : मार्चमध्ये मित्रांसोबत आउटिंगसाठी बेस्ट ठिकाणे

 

- Advertisment -

Manini