Friday, May 17, 2024
घरमानिनीRelationshipब्रेकअपनंतर स्वत:ला असे सावरा

ब्रेकअपनंतर स्वत:ला असे सावरा

Subscribe

रिलेशनशिपमध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही वेळेस असे होते की, एखाद्याचे ऐकून आपण पार्टनरवर संशय घेतो. अशातच नाते मोडले ही जाते. जेव्हा ब्रेकअप होते तेव्हा त्याचे दु:ख दीर्घकाळ राहते. व्यक्तीला आपण नक्की काय करावे हे कळत नाही. अशातच ब्रेकअपनंतर स्वत: ला कसे सावरावे याच बद्दलच्या काही टीप्स जाणून घेऊयात.

-स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा
आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमीच भुतकाळातील गोष्टी मागे ठेवावे असे सांगितले जाते. त्यामुळे आयुष्यात जर जुन्या गोष्टी विसरुन पुढे गेलात तरच नव्याने पुन्हा सुरुवात करता येईल. ब्रेकअपनंतर स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

-आपल्या आवडी-निवडीकडे लक्ष द्या
आयुष्यात आपल्याला काही गोष्टी आवडतात. मात्र त्या एखाद्या कारणास्तव करता येत नाही. अशातच तुम्ही तुमची आवड , छंद जोपासला पाहिजे. जेणेकरुन तुम्ही ब्रेकअपच्या दु:खापासून डिटॅच होण्यास मदत होईल.

10 Signs That You Need To Breakup With a Friend - But First, Joy

- Advertisement -

-मित्रांसोबत वेळ घालवा
दिवसभर एकाच व्यक्तीबद्दल विचार केल्याने तणावाची स्थिती अधिक वाढू शकते. ब्रेकअप झाल्यानंतर असे केल्याने मानसिक त्रास होतो. त्यामुळे मित्रपरिवारासोबत वेळ घालवावा. त्यांच्यासोबत तुमच्या भावना शेअर करा.

-आपले विचार लिहा
काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही. अशातच ब्रेकअपच्या दु:खापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या भावना, विचार एका डायरीत लिहा. जेणेकरुन तुमचे मन हलके होईल.

-सेल्फ हॅप्पीनेस गरजेचा
एकमेकांची काळजी घेण्यात आपण कधीकधी स्वत:चा हॅप्पीनेस विसरतो. अशातच ब्रेकअप नंतर आयुष्यात पुढे जायचे असेल तर सेल्फ लव्ह आणि सेल्फ हॅप्पीनेस गरजेचा आहे.


हेही वाचा- लग्न मोडण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini