Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship लग्न मोडण्यास कारणीभूत ठरतात 'या' गोष्टी

लग्न मोडण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ गोष्टी

Subscribe

घटस्फोटाची प्रकरणे अलीकडल्या काळात सातत्याने वाढत चालली आहेत. घटस्फोट होण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यापैकी काही कारणे अशी आहेत की, सध्याची बदलेली लाइफस्टाइल, भावनांचा सन्मान न करणे. मात्र या व्यतिरिक्त कोणती कारणे आहेत हे जाणून घेऊयात.

नवरा-बायकोमधील प्रेम कमी होणे
लग्नानंतर अशा लोकांमधील प्रेम कमी होते जे खरंतर लव्ह मॅरेज करतात. कारण नवरा-बायकोच्या नात्यात आल्यानंतर जबाबदाऱ्या वाढल्या जातात आणि याच कारणास्तव एकमेकांना अधिक वेळ देता येत नाही. हे कारण कधीकधी नाते मोडण्यास कारणीभूत ठरू शकते. या व्यतिरिक्त असे सुद्धा दिसून येते की, काही लोक आपल्या पार्टनरला फॉर ग्रांटेड घेऊ लागतात.

- Advertisement -

शारीरिक गरजा पूर्ण न करणे
सेक्स लाइफ उत्तम असेल तर तुमचे नाते दीर्घकाळ टिकते असे म्हटले जाते. मात्र जर तुमच्या शारीरिक गरजा पार्टनरकडून पूर्ण केल्या जात नसतील तर नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

एक्स्ट्रा मॅरेज रिलेशन
बहुतांश मॅरिड कपल आपल्या शारीरिक आणि भावनात्मक रुपात आपल्या गरजा पूर्ण होत नसेल तर एक्स्ट्रा मॅरेज रिलेशनचा पर्याय निवडतात. याच कारणास्तव बहुतांश लोकांचे लग्न मोडले जाते. त्याचसोबत सध्या विश्वास लगेच कोणीही एकमेकांवर ठेवत नाहीत.

- Advertisement -

पार्टनरचा आदर न करणे
लग्नानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहण्यास सुरुवात करता तेव्हा हळूहळू त्याचा खरा स्वभाव कळू लागतो. जो तुम्हाला अजिबात आवडत नाही. याच कारणास्तव त्याचा पाणउतारा करणे, त्याचा आदर न करणे अशा कारणास्तव ही लग्न मोडले जाते.

पार्टनरसाठी अपशब्दांचा वापर करणे
लग्नात सर्वाधिक शोषण भावनात्मक रुपात केले जाते. मात्र आज सुद्धा बहुतांश लोक मारहाण हे शोषणाच्या श्रेणीत ठेवतात. अशातच अपशब्दांचा वापर ही पार्टनरकडून केला तरीही त्या काही बोलत नाही. त्यांना समाज आपल्याला काय बोलेल याची भीती वाटत राहते. मात्र मर्यादा ओलाडल्या गेल्यानंतर लग्न मोडलेच जाते.


हेही वाचा- ब्लाइंड डेटवर जात असाल तर ‘या’ सेफ्टी टीप्स ठेवा लक्षात

- Advertisment -

Manini