Monday, May 6, 2024
घरमानिनीFashion'या' आउटफिटसोबत ट्राय करा केप जॅकेट

‘या’ आउटफिटसोबत ट्राय करा केप जॅकेट

Subscribe

तुम्ही तुमचा लूक स्टायलिश करण्यासाठी विविध प्रकारचे फॅशनेबल आउटफिटला स्टाइल करता. तुम्ही फॅशन ट्रेंडनुसार हे सर्व बदल करत असता. तुम्हाला काही तरी नवीन फॅशन ट्राय करून पाहायचे असेल तर यावेळी तुमच्या कपड्यासोबत केप जॅकेट घाला. सध्या बॉलिवूड अभिनेत्रींना केप जॅकेटची भुरळ पडली आहे. तुम्ही हे के जॅकेट कसे स्टाइल करू शकता. यासाठी काही टीप्स दिल्या आहे.

साडीसोबत घ्या रफल केट जॅकेट

- Advertisement -

जर तुम्हाला साडीसोबत वेगळे स्टायलिंग करायला आवडत असेल, तर यावेळी साडीसोत रफल स्टाइलचे जॅकेट ट्राय करून बघा. हे जॅकेट घातल्याने तुम्हाला एक क्लासी लूक येतो. हे जॅकेट तुम्ही कट स्लीव्स ब्लाउजसोबत स्टाईल करू शकता. या जॅकेट्सची खास गोष्ट अशी आहे की साडीसोबतच नाही तर वेगवेगळ्या ड्रेससोबत देखील तुम्ही हे जॅकेट स्टाईल करू शकता.

क्रॉप टॉपसोब स्टाइल करा केप जॅकेट

- Advertisement -

जर तुम्हाला वेस्टर्न आउटफिट्स स्टाईल करायला आवडत असतील तर तुम्ही त्यासोबत केप जॅकेट देखील स्टाइल करू शकता. यासाठी जीन्ससोबत क्रॉप टॉप घालावे. तरच तो तुमचा लूक परिपूर्ण होईल. लक्षात ठेवा की जर वरचा भाग साधा असेल तर तुम्ही कामाच्या ठिकाणी देखील हे जॅकेट घालू शकता. या जॅकेटमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसता.

ड्रेससोबत ट्राय करा केप जॅकेट

तुम्ही बऱ्याचदा ड्रेससोबत वेगवेगळ्या पद्धतीने ओडणी स्टाईल करता. यावेळी तुम्ही केप जॅकेट स्टाईल करून बघा. तुमचा लुक इंडो-वेस्टर्न असेल, तर या लुकवर ड्रोससोबत मिळते जुळते जॅकेट खरेदी करा आणि कोणत्याही पार्टीत आणि सण-उत्सवामध्ये हा हे लुक ट्राय करा.

‘या’ गोष्टींकडे लक्ष द्यावे

  • जेव्हा तुम्ही केप जॅकेट खरेदी करता, तेव्हा फॅब्रिकची विशेष काळजी घ्या.
  • केप जॅकेट खरेदी करताना फिटिंग योग्य आहे का? हे एकदा तपासून पाहा.
  • कलर कॉम्बिनेशन मॅच करून जॅकेट खरेदी करा

हेही वाचा – Monsoon Fashion Tips: मॉन्सूनमध्ये वापरू नयेत ‘या’ फॅब्रिकचे कपडे

- Advertisment -

Manini