घरलाईफस्टाईल'महाराष्ट्रीयन नथीं'चे हे प्रकार माहिती आहेत का?

‘महाराष्ट्रीयन नथीं’चे हे प्रकार माहिती आहेत का?

Subscribe

नथ हा असा दागिना आहे जो कोणत्याही कपड्यांची शोभा वाढवतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात नथ हा दागिना महिलेकडे असतो. सोन्यात घडवलेला हा दागिना सौंदर्यात भर घालणारा असा आहे. पूर्वी नथीचा एकच प्रकार दिसायचा. एक मोठी मोत्यामध्ये घडवलेली नथ असायची पण आता वेगवेगळ्या आकाराच्या नथी मिळतात. ज्या तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात.

कोल्हापुरी नथ

RG Medium Size Kolhapuri Traditional Nath at Rs 300/piece in Kolhapur | ID:  17624156388कोल्हापुरी नथ ही महाराष्ट्रातील प्रचलित अशा नथीच्या प्रकारापैकी एक आहे.अर्धगोल मोत्यांची गुंफण करुन या दागिना घडवला जातो. यामध्ये मोतीच्या दोन सरी किंवा एक सर असते नथीच्या वरच्या भागावर मोर किंवा एखादा खडा असतो. कोल्हापुरी अशी ही नथ नथडा म्हणून ओळखली जाते.

- Advertisement -

कारवारी नथ

महाराष्ट्रियन दुल्हन के लिए होती हैं 7 तरह की नथ, सभी के अलग हैं नाम |  Maharashtrian Nath Designs for Brideकारवारी नथीची रचनाही काहीशी बानू नथीसारखीच आहे. ही नाथ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील संस्कृतिक परंपरेतून आली आहे. कर्नाटकातील कारवार गावावरून हे नाव पडले आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या नथांच्या रचनेलाही थोडासा दक्षिणेचा स्पर्श आहे. या नथीला सोन्याचा मुलामा असतो. अनेकींना या नथीबद्दल माहिती नसल्याने आपण खरेदीला गेल्यावर या नथीचा उल्लेख करत नाही.

पुणेरी नथ

TRADITIONAL NATH – Sonchafaपुणेरी नथ बानू आणि कारवारीपेक्षा नथीपेक्षा डिझाईनमध्ये थोडी वेगळी आहे. या नथीला 2 फुलासारखी डिझाईन्स केलेली असतात. एक वरच्या बाजूला मोठा खडा आणि दुसरा तळाशी मोत्यांनी तयार केलेला असतो. मधला भाग मोत्यांनी तयार केलेला असतो. या मोत्यांचा आकारही थोडा मोठा असतो.

- Advertisement -

मोरणी नथ

Morni Nath Design 2024 | towncentervb.comमोरणी नथ ही देखील हल्लीच्या काळात खूपच प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये छान बाकदार मोर असतो. या मोराचा आकार लहान मोठा असतो. त्यानुसार या नथीचा आकार ठरत असतो. जर तुम्ही मोर नथ कधी पाहिली असेल तर तुम्हाला यावर केलेला बारीक काम नक्की आवडेल. जास्तीत जास्त या नथीमध्ये धातू असतो. त्यामध्ये गुलाबी रंगाचे किंवा अमेरिकन डायमंड बसवलेले असतात. त्यामुळे ही नथ खूप भरगच्चच आणि सुंदर दिसते.

काशीबाई नथ

Pin On Exquisite Pc, 44% OFF | pei.unitru.edu.peराणी काशीबाई यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली ही नथ आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत असेल. काशीबाई नथ ही दिसायला भरगच्च दिसते. या नथीला मोत्याचे आणि खड्यांचे कोंदण केलेले असते. बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर ही नथ मोठ्या प्रमाणात सगळीकडे मिळू लागली आहे.

पेशवाई नथ

Gold Plated White Pearl Beaded Peshwai Moti Nathपेशवाई संस्कृती, कला आणि सर्जनशील प्रेमासाठी ओळखली जाते. ही नथही यातूनच प्रेरित आहे. पेशव्यांची कला, संस्कृती आणि सर्जनशीलता या नथीमध्ये पाहायला मिळते. हा नथही महाराष्ट्रात सर्वाधिक पारंपारिक कार्यक्रम, सण-समारंभांसाठी परिधान केली जाते.

हिऱ्याची नथ

नववधूसाठी नथींच्या सुंदर डिझाइन्ससध्या महिलावर्गात हिऱ्याच्या नथची क्रेझ सर्वाधिक पहायला मिळते. या नथीमध्ये अमेरिकन हिरे किंवा वास्तविक हिरे बसवले जातात. यासोबतच काही रंगाचे खडेही जोडलेले आहेत. ही नथ सोन्या-चांदीच्या दोन्हींमध्ये तयार केली जाते. दिसायला खास, खूप सुंदर असणारी ही नथ सामान्य महाराष्ट्रीयन नथींसारखीच आहे.

मोत्याची नथ

Buy Maharashtrian moti nath for non piercing (press style) in red stone  (size 1) Online @ ₹270 from ShopClues

कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही मोत्याची नथ शोभून दिसते. या नथीसह आपण मोत्याचे दागिने घातले तर आणखी शोभा वाढते. या नथीची ओळख खड्यानेच होते. शिवाय ही नथ आकाराने सगळ्या नथींपेक्षा थोडी मोठी असते.

नथींचे हे काही प्रकार आणि या शिवाय मिळणारे ब्राम्हणी नथ, वऱ्हाडी नथ,सरजाची नथ, येसूबाई नथ अशा काही नथी नक्की ट्राय करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -