शरिराची लवचिकता वाढवण्यासाठी करा ‘उष्ट्रासन’

शरिराची लवचिकता वाढवण्यासाठी करा ‘उष्ट्रासन’

शरिराची लवचिकता वाढवण्यासाठी तसेच ताकद वाढवण्यासाठी उष्ट्रासन हे आसन केले जाते. उष्ट्र हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ उंट असा आहे. उष्ट्रासनाला इंग्रजीमध्ये Camel Pose म्हणून देखील ओळखले जाते. छाती आणि खांदे उघडून हे आसन केले जाते. नियमित केल्याने शरीर लवचिक बनविण्यास मदत तर होतेच मात्र शरीर ताकदवान बनून पचनशक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे पाठ आणि खाद्यांना मजबूती मिळून पाठीचा कणा लवचिक होते.

स्त्रियांना मासिकपाळी आल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्या समस्या दूर करण्यासाठी हे आसन स्त्रियांना मदत करते. जे लोक झुकून चालतात, ज्यांचे खांदे चालताना पुढे झुकल्या सारखे असतात त्यांच्या शरिराची ठेवण नीट करणारं हे आसन आहे. तसेच थायरॉइड ग्रंथींचे आजार दूर ठेवण्यास उष्ट्रासन हे आसन फायद्याचे ठरते.

या व्यक्तीने घ्यावी काळजी

ज्यांना कंबरदुखी आणि मानेच्या संबंधित आजार असेल तसेच उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त असतील तसेच हार्नियाचा अशा व्यक्तींनी हे आसन करणं प्रामुख्याने करू नये.

उष्ट्रासनाचे हे आहेत फायदे

 

असे करा उष्ट्रासन

  1. वज्रासनात बसून मग गुडघ्यावर उभे राहा. हात पार्श्वभागावर ठेवा. गुडघे खांद्याला समांतर आणि पायाचे तळवे आकाशाच्या दिशेला असतील.
  2. आता श्वास घेत हळुहळू डावा हात मागे घेऊन जा. डाव्या पायाच्या तळव्यावर हात ठेवा. अशा प्रकारे उजवा हातही उजव्या पायाच्या तळव्यावर ठेवा.
  3. यावेळी कंबर मागच्या बाजूला वाकलेली असेल. आता मान मागे आणि एकदम सैल सोडा. लांब श्वास घेत, जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आसनात थांबून राहा.
First Published on: October 19, 2019 6:30 AM
Exit mobile version