बऱ्याचवेळा सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणातील भाज्या उरतात. काहीजण त्या गरम करून पुन्हा खातात. तर काहीजणं फेकून देतात. पण याच उरलेल्या भाज्यांपासून तुम्ही टेस्टी कटलेट बनवू शकता.
साहित्य :
- 2 वाट्या उरलेली कुठलीही भाजी
- 2 उकडलेले बटाट
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 2 कप ब्रेडचा चुरा
- मीठ चवीनुसार
- 2 चमचे तेल
- लाल तिखट
- 1 चमचा हळद
- कोथिंबीर
कृती :
- एका बाऊलमध्ये भाज्या, बटाटा, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबिर, तिखट, हळद, मीठ घ्या.
- सर्व मिश्रण एकत्र करा. तळहात पाण्याने ओला करा.
- त्यावर भाज्यांचे एकत्र मिश्रण कटलेटच्या आकाराने थापा.
- ब्रेडचा चुऱ्यात घोळवून कमी तेलात तळून घ्या.
- तयार कटलेट सॉससोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :