Friday, April 19, 2024
घरमानिनीKitchenVeg Lollipop : टेस्टी व्हेजिटेबल लॉलीपॉप

Veg Lollipop : टेस्टी व्हेजिटेबल लॉलीपॉप

Subscribe

आपण अनेकदा नॉन व्हेज लॉलीपॉप खातोच. परंतु जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी देखील व्हेजिटेबल लॉलीपॉप हा एक चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जिटेबल लॉलीपॉप कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 5/6 बेबी कॉर्नस
 • आल्याची पेस्ट
 • हिरवी मिरची
 • उकडलेले बटाटे
 • गाजर
 • मटार
 • रताळं
 • लाल तिखट
 • चाट मसाला
 • गरम मसाला
 • चवीनुसार मीठ
 • कोथिंबीर
 • तेल

कृती :

Veg Lolipop with a dip - Aarti Madan

- Advertisement -
 • सर्वप्रथम आलं बारीक कापून घ्यावं आणि त्यात हिरवी मिरची थोडंसं मीठ घालून वाटून घ्या.
 • त्यानंतर गाजर किसून घ्या आणि हे झाल्यावर मटार मिक्सरमधून काढावे.
 • आता फ्राय पॅनमध्ये तेल घालून आल्याचे तुकडे, मिरची पेस्ट, गाजराचा किस, मटार पेस्ट, उकडलेले बटाटे कुस्करून, उकडलेला रताळं कुस्करून, थोडं मीठ घालून हे सर्व मिश्रण परता.
 • नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम मसाला, तिखट, चाट मसाला घालून मिसळून त्याचा गोळा करून घ्या.
 • बेबी कॉर्नचे प्रत्येकी दोन उभे काप करावे आणि प्रत्येक कापाच्या एका टोकावर वरील मिश्रणाचा बेस त्याला लावावा.
 • त्यावर थोडेसे कॉर्न स्टार्च घालावे. नंतर तेलात तळावे.
 • हे लॉलीपॉप सॉससोबत सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

Recipe : पनीर कॉर्न रोल

- Advertisment -

Manini