‘तणावमुक्त’ राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टी…

‘तणावमुक्त’ राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टी…

प्रातिनिधिक फोटो

माणूस म्हटलं की समस्या, टेन्शन्स या गोष्टी ओघाने आल्याच. कामाचा किंवा घरचा ताण आणि त्यामुळे होणारा मनस्ताप या गोष्टी अटळ असल्या तरी या तणावाचा चुकीचा परिणाम आपल्यावरच होत असतो. त्यामुळे तुम्ही स्वत:ला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याची गरज असते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तणाव दूर करण्याचे काही सोपे उपाय…

१. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या घरच्यांसोबत, प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांच्याशी बोला. गरज असल्यास त्यांना आवश्यक मदत करा. तुम्हाला समाधान मिळेल.

प्रातिनिधिक फोटो

२. तुमच्या घरातील किंवा परिचयातील अन्य लहान मुलांसोबत वेळ घालवा. त्यांची निरागसता अनुभवा. त्यांच्यासोबत तुम्हीही लहान व्हा, निरागस व्हा. तुमचा तणाव दूप पळेल.

प्रातिनिधिक फोटो

३. तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट सतत घोळत असेल किंवा एखादी चिंता तुम्हाला सतावत असेल, तर त्याविषयी बोला. बोलल्याने तुमचं मन हलकं होईल. कदाचित समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या समस्येवर उपाय मिळून जाईल.

प्रातिनिधिक फोटो

४. एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी भरवत असले, तुमच्याशी सतत निराशजनक पद्धतीने बोलत असेल तर अशा व्यक्तींना टाळा. सकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.

प्रातिनिधिक फोटो

५. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींशी बोला, त्यांच्याजवळ मन हलकं करा. त्यांचे अनुभवाचे गाठोडे साहजिकच तुमच्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे तुमचा तणाव दूर करण्यासाठी ते नक्कीच मदत करु शकतात.

प्रातिनिधिक फोटो
First Published on: June 23, 2018 6:08 PM
Exit mobile version