जैन धर्मातील लोक जमिनीत उगवलेल्या भाज्या का खात नाहीत?

जैन धर्मातील लोक जमिनीत उगवलेल्या भाज्या का खात नाहीत?

जगभरामध्ये हिंदू, इस्लाम, ईसाई, बौद्ध, शीख, ख्रिश्चन आणि जैन असे अनेक धर्म प्रचलित आहेत. यातील प्रत्येक धर्माची आपली खास ओळख आणि विशेषता आहे. त्यांपैकी जैन धर्माची देखील वेगळी खासीयत आहे. आज आपण याचं वेगळ्या परंपरांमागील काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

जैन धर्मातील लोक जमिनीत उगवलेल्या भाज्या का खात नाहीत?


खूप कमी लोकांना माहित आहे की, जैन धर्मामध्ये बटाटा तसेच जमीनीतील कंदमुळं खाणं वर्जित मानलं जातं. जमीनीच्या आतमध्ये उगवणाऱ्या भाज्यांना कंदमुळं म्हटलं जातं.

यामध्ये बटाटा, लसूण, कांदा, मूळा, गाजर, बीट, रताळे, सूरन यांसारखी कंदमुळं खाल्ली जात नाहीत. कारण जैन धर्मामध्ये जमीनीच्या आतमध्ये उगवणाऱ्या भाज्यांना अशुद्ध मानलं जातं.

जैन धर्मातील लोकांच्या मते, अशा पद्धतीच्या पदार्थांचे सेवन केल्याने मानवामध्ये तामसिक भाव उत्पन्न होतात. ज्यामुळे लोक चुकीच्या मार्गाने चालतात.


हेही वाचा :

डायबिटीस असूनही बटाटा खातायं? मग अगोदर वाचा डॉक्टरांचा सल्ला

First Published on: November 1, 2022 3:08 PM
Exit mobile version