Tuesday, May 7, 2024
घरमानिनीमहिलांना आवडतात 'असे' पुरुष

महिलांना आवडतात ‘असे’ पुरुष

Subscribe

महिलांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणं थोडं कठीणच आहे. परंतु काही महिला आपल्या भावनांमधून खुप काही बोलून जातात. असे म्हटले जाते की, सर्व महिला या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. आजच्या काळात महिला एक उत्तम पुरुष मित्राशी मैत्रीही करु पाहतात. पण एखाद्याला महिलेला अशी पुरुष मंडळी आवडतात जे त्यांचा विश्वास संपादन करतात. अशातच जाणून घेऊयात महिलांना नक्की कशा प्रकारचे पुरुष आवडतात त्याच बद्दल अधिक.

-बुद्धिमान पुरुष
अशा प्रकारच्या पुरुषांचा सेंस ऑफ ह्युमर कमालीचा असतो. त्यांचे बोलणे ते परखडपणे मांडतात. कोणताही विषय असो ते त्यावर अगदी कौशल्याने बोलतात किंवा उतत्तर देतात. प्रत्येकाला अशा व्यक्तींना ऐकणे फार आवडते. बुद्धिमान पुरुषांसोबत खुप वेळ बसून गप्पा मारल्या तरीही कंटाळा येत नाही. कारण ते आपल्याला जे काही सांगत असतात ते सतत त्यांच्याकडून ऐकत रहावे असे वाटत राहते.

- Advertisement -

-सेंसिटिव पुरुष
प्रत्येक महिलेला सेंसिटिव पुरुष जरी असले तरीही त्यांच्या सुद्धा भावनांना महत्व देणारे आवडतात. महिला आयुष्यभर अशा व्यक्तींसोबत राहणे पसंद करतात. हे असे पुरुष तुमच्या गोष्टी ऐकतात. पण तुम्ही सुद्धा त्यांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे.

-आत्मविश्वासी पुरुष
आत्मविश्वासी पुरुष मंडळी ही महिलांना फार आवडतात. त्यांचा महिलांच्या प्रति आदर, स्वत: बद्दलचा आत्मविश्वास अशा काही गोष्टींमुळे महिला त्यांच्यासोबत राहू इच्छितात. आत्मविश्वासी माणसं ही महिलांवर अधिक निर्भर नसतात. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेततात.

- Advertisement -

-रोमँन्टिक पुरुष
रोमँन्टिक पुरुष थोडे फिल्मी असतात. आपल्या पार्टनरला ते नेहमीच काही ना काही गिफ्ट देत असतात. खरंतर महिलांना आपली तारीफ करणारे पुरुष आवडतात. कारण त्यांना ते स्पेशल फिल करुन देतात. महिलांना असे ही वाटते की, असे पुरुष आपली खुप काळजी करतात.

-बिंधास्त पुरुष
अशी पुरुष मंडळी महिलांना नेहमीच आकर्षित करतात. जरी त्यांचे वागणूक, बोलणे थोडे हटके असेल तरीही अशी मंडळी फार बडबडी असतात. यावरच काही महिला भाळतात. त्यांना असे वाटते की, बोल्ड टाइप असलेल्या पुरुषांसोबत त्यांचे आयुष्य ही बिंधास्त पद्धतीने जगता येईल.


हेही वाचा- तो तुमच्याशी खोट बोलतो का? कसे ओळखाल

- Advertisment -

Manini