Friday, April 26, 2024
घरमानिनीतो तुमच्याशी खोट बोलतो का? कसे ओळखाल

तो तुमच्याशी खोट बोलतो का? कसे ओळखाल

Subscribe

खोटं बोलणे आणि ते पकडणे ही कॉम्प्लेक्स गोष्ट असते. जर एखाद्या व्यक्तीला ठीकपणे खोटं बोलता येत नसेल तर त्यासाठी खोटं बोलणे फार मुश्किल होते. कारण असं बोलणाऱ्यांना आपण लगेच पकडू शकतो. खासकरुन जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरशी खोटं बोलता आणि हे जेव्हा त्याला कळून चुकते तेव्हा तुमच्यात वाद होतात.

आपल्याला असे शिकवले जाते की, कोणत्याही नात्यात खोटं बोलू नये. पण नवरा-बायकोच्या नातयात काही गोष्टींसाठी खोटं ही बोलले जाते. पण खरंच असे करावे का? तसेच जर तो तुमच्याशी खोटं बोलत असेल तर कसे ओळखाल याच बद्दलच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

-तुमची नजर चुकवणे
जर एखादा व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असेल तर समोरचा व्यक्ती तुमची नजर चुकवू पाहतो. काही लोक अशा ही काही गोष्टी करतात ज्यामुळे एक खोटं बोलल्यानंतर ते पुढे सुद्धा खोटं बोलतात. असे करणे तुमच्या नात्यात वाद निर्माण करु शकतातच. पण पार्टनर तुमच्या नजरेला नजर मिळवून बोलत नसेल तर समजून जा तो खोटं बोलत आहे.

-बॉडी लँग्वेज बदलणे
काही लोक खोटं बोलताना अशा काही गोष्टी करतात ज्या ते नेहमी करत नाहीत. उदाहरणार्थ, एखादी गंभीर विषयावर बोलताना अगदी कॅज्युअल बॉडी लँग्वेज ठेवणे. दररोज जसे व्यवहार करतो तसे न करणे यावरुनच समजून जा तो तुमच्याशी खोटं बोलत आहे.

- Advertisement -

-महत्वाच्या गोष्टी टाळणे
जर तुम्ही पार्टनरला एखादी महत्वाची गोष्ट सांगत असता तेव्हा तो तुमच्याकडे अधिक दुर्लक्ष करत असेल तर समजून जा काहीतरी झाले आहे. अथवा तो तुम्हाला फेस करु शकत नाहीयं. दुसरे असे की, तुमच्याशी बोलताना तो कधीकधी खोटं सुद्धा बोलत असेल.

-सरळ उत्तर न देणे
काही वेळएस एकाच प्रश्नाचे सरळ उत्तर न देणे हे सुद्धा पार्टनरच्या खोटं बोलण्यापैकी एक असते. तुम्हाला तो तुमच्याच बोलण्यात गुंतवून ठेवतो. तुमचे बोलणे टाळतो किंवा बोलत असताना मध्येच विषय बदलतो.

-वेळ न देणे
ही समस्या बहुतांश करुन विवाहित महिलांमध्ये दिसून येते. पार्टनर त्यांच्यासाठी वेळ काढत नाहीत. अथवा अचानक कामात व्यस्त होतात. काम असतातच पण वेळेपेक्षा अधिकच तो तुम्हाला वेळ देत नसेल तर तो तुमच्याशी खोटं बोलत असेल.


हेही वाचा- नातेसंबंधात या ६ व्यक्ती देऊ शकतात बेस्ट सल्ला

- Advertisment -

Manini