करा ‘ही’ योगासने, रहा तणावापासून दूर

करा ‘ही’ योगासने, रहा तणावापासून दूर

आजकाल धकाधकीच्या जिवनात ताण तणाव येतो. शारीरिकरित्या फिट राहण्यासाठी आपण अनेक एक्ससाइज करतो. बरेच जण योगा करतात. परंतु मानसिकरित्या फिट राहण्यासाठी आपण फार गोष्टींचा अवलंब करतो. मानसिक आणि शारिरीकरित्या फिट राहण्यासाठी आपल्याला योगा खूप मोठी मदत करतो. धकाधकाचीच्या जिवनात तणामुक्त आयुष्यातून बाहेर येण्यासाठी योगासने करणे कधीही उत्तम. जाणून घेऊया ताण ताणाव कमी करण्यासाठी महत्त्वाचे योग प्रकार.

अनुलोम विनोम

हा प्रामायाम करण्यासाठी सरळ बसावे. त्यानंतर उजव्या नाकपुडीला डाव्या हाताच्या अंगठ्याने दाबून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. हा योगाप्रकार नियमितपणे कमीत कमी ३ ते ५ मिनिटे केल्याने ताणापासून दूर राहण्यासाठी मोठी मदत होते.

बालासन

बालासन हा योगा प्रकार केल्याने तणामुक्त राहण्यासाठी मोठी मदत होते. बलासन करण्यासाठी गुडघ्यात वाकून जमेल तितक्या लांब बसून हात पुढच्या बाजूस खेचून घ्या. हा योगाप्रकार अतिशय सोपा आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज ५ मिनिटे हा योगा केल्याने ताणामुक्त राहण्यास मोठी मदत होते.

मार्जरी आसन

मार्जरी आसन हे अतिशय सोपे आसन आहे. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसून आधी उंटासारखी पोझिशन घ्या. त्यानंतर हळू हळू पाठ ताठ करून गुडघ्यावर बसून श्वास घ्या. हळूहळू पोट आत बाहेर करा. याने मनाला पूर्णपणे शांत वाटेल आणि तुम्हाला असलेला ताण कमी होण्यास मदत होईल.

पश्चिमोत्नसन

पश्चिमोत्नसन हा योगाप्रकार करण्यासाठी दोन्ही पाय पूर्णपणे सरळ रेषेत लांब करा. दोन्ही हात पायाच्या दिशेत पुढे करा आणि डोके खाली वाकवा. त्यानंतर हळू हळू सामान्य स्थितीमध्ये या. हा योगाप्रकार केल्यानंतर मेंदूचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मोठी मदत होते.

शवासन

शवासन हा योगाप्रकार सर्वासाठी अतिशय सोपा आणि आवडीचा योग प्रकार आहे. या आसनात जमिनीवर झोपून शरीर सैल सोडून द्यावे. या योगाप्रकारामुळे तणावामुक्त राहण्यास मोठी मदत होते. धावपळीच्या युगात तणावमुक्त राहण्यासाठी योग्य आहार आणि नियमित योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नियमित योगा करा आणि शारिरीक आणि मानसिकरित्या संतुलित रहा.


हेही वाचा – आहार भान – मिक्स व्हेज सूप

 

First Published on: December 25, 2020 10:04 PM
Exit mobile version