राज ठाकरे

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाची लिटमस टेस्ट करून मूळ ताकद विधानसभा निवडणुकीत आजमावण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंच्या मनसेला कुणाची आणि किती मतं मिळतात, यावर मतदारसंघ पातळीवर बरंच काही अवलंबून असणार आहे.
A view of the sea
Prakash Gujar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापन दिनी अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर कसून टीका केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून भाजपने राजकारण केले असल्याचे त्यांनी म्हटलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या विरोधातही त्यांनी वक्तव्य केले. 'भाजपच्या ट्रोलर्सला घारातून बाहेर काढून मारा' असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

Pravin Wadnere

पुलवामा हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले, ते राजकीय बळी होते असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना राज ठाकरेंनी हा आरोर केला आहे. ‘पुलवामा हल्ल्याच्या चौकशीमध्ये अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. पण शहीद झालेले जवान हे राजकीय बळी होते. निवडणुकांच्या आधी हे काहीतरी मोठं घडवतील असं वाटलंच होतं.

वाचा सविस्तर :

पुलवामातील शहीद हे राजकीय बळी – राज ठाकरे
Pravin Wadnere

सरकारचे अपयश लपवण्यासाठी आणखी काहीही घडवले जाऊ शकते, या आपल्या याआधीच्या आरोपाची री ओढत नोटबंदी, जीएसटी, राफेल आणि गंगाप्रकल्पातून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सरकार काहीही घडवून आणू शकेल, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पुलवामातील हल्ल्यावरून राज यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत हे उघड व्हायचे असेल तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा गंभीर आरोपही राज यांनी कोल्हापूरमध्ये केला.

वाचा सविस्तर :

अपयश झाकण्यासाठी सरकार काहीही करेल
First Published on: February 26, 2019 4:53 PM
Exit mobile version