घरमहाराष्ट्रअपयश झाकण्यासाठी सरकार काहीही करेल

अपयश झाकण्यासाठी सरकार काहीही करेल

Subscribe

राज ठाकरेंचा घणाघात

सरकारचे अपयश लपवण्यासाठी आणखी काहीही घडवले जाऊ शकते, या आपल्या याआधीच्या आरोपाची री ओढत नोटबंदी, जीएसटी, राफेल आणि गंगाप्रकल्पातून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सरकार काहीही घडवून आणू शकेल, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पुलवामातील हल्ल्यावरून राज यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत हे उघड व्हायचे असेल तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा गंभीर आरोपही राज यांनी कोल्हापूरमध्ये केला.

येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर आपले अपयश झाकण्याशिवाय या सरकारला पर्याय नाही. ते करण्यासाठी निवडणुकीदरम्यान काहीतरी मोठे घडवले जाईल, असे भाकित राज ठाकरेंनी मुंबईत मध्यंतरी व्यक्त केले होते. पुलवामातील जवानांवरचा हल्ला ह यातलाच प्रकार असल्याचा आरोप राज यांनी केला. या हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी ठरले आहेत. एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये आजवर चालत आलेले सत्य आहे. काँग्रेस सरकारनेही ते केले. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झालीय. बातम्या पसरवल्या जाताहेत, पेरल्या जात आहेत. त्यामुळे नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणे जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्या दरम्यान सरकारकडून काहीतरी मोठे घडवले जाईल, अशी भीती राज यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

डोवाल यांची चौकशी करा
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करण्याची जोरदार मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. सरकारच्या या सर्व निर्णयांमागे सल्लागार असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेच जबाबदार आहेत. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या दोन गट पडले आहेत. हे काय प्रकरण होते, काय प्रकरण घडलेय? राफेल विसरावे, नोटाबंदीत झालेला गैरव्यवहार विसरावा यासाठी हे सुरु आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -