घरमहाराष्ट्रपुलवामातील शहीद हे राजकीय बळी - राज ठाकरे

पुलवामातील शहीद हे राजकीय बळी – राज ठाकरे

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून पुलवामा हल्ल्याविषयी न बोलणारे राज ठाकरे अखेर या हल्ल्याविषयी बोलले आहेत. 'हल्ल्यात झालेले शहीद हे राजकीय बळी आहेत', असा आरोप त्यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले, ते राजकीय बळी होते असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना राज ठाकरेंनी हा आरोर केला आहे. ‘पुलवामा हल्ल्याच्या चौकशीमध्ये अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. पण शहीद झालेले जवान हे राजकीय बळी होते. निवडणुकांच्या आधी हे काहीतरी मोठं घडवतील असं वाटलंच होतं. त्यातून मूळ मुद्दे लोकांना विसरायला लावले जातात’, असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा – ‘राज ठाकरे बदलले आहेत, त्यांना सोबत घ्या’ – अजित पवार

‘जवान शहीद होतायत आणि हे मतं मागतायत’

दरम्यान, यावेळी अजित डोवाल यांची चौकशी करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली. ‘अजित डोवाल यांची चौकशी झाल्यावर बऱ्याच गोष्टी उघड होतील’, असं राज ठाकरे म्हणाले. ‘तिकडे सीमेवर आमचे जवान शहीद होत आहेत आणि इकडे हे मतं मागत आहेत’, अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शिवाय ‘प्रसारमाध्यमांना, पत्रकारांना आणि त्यांच्या मालकांना विकत घेऊन यांनी प्रचार चालवला आहे’, असा आरोप देखील राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केली.

- Advertisement -
Raj Thackeray at Kolhapur
कोल्हापूरमध्ये राज ठाकरेंनी अंबाबाईचं दर्शन घेतलं

राज ठाकरे सध्या पुणे, कोल्हापूर आणि सिधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये रविवारी त्यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरात दर्शन घेतलं. सोमवारी भराडी देवीचं दर्शन घेऊन राज ठाकरे आंगणेवाडीच्या जत्रेत देखील सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -