४८ तासांत १६०च्या वर जीआर

४८ तासांत १६०च्या वर जीआर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

एका बाजूला महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी कोसळेल, अशा चर्चांना ऊत आलेला असतानाच ठाकरे सरकारकडून मागील ४८ तासांत १६०च्या वर शासनआदेश जारी करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या शासन आदेशांवर शंका उपस्थित करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शुक्रवारी पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील महाविकास आघाडी सरकारतर्फे अंदाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घेत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात येत आहे. हा प्रकार संशय वाढविणारा आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे व हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. (160 GR in 48 hours)

हेही वाचा – मुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात; तलावांत फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रानुसार गेल्या ३ दिवसांत राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानसुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळाले आहे.

हेही वाचा – मुंबईतील मतदारांमध्ये ७ लाखांनी वाढ; मतदार यादी प्रसिद्धी

या परिस्थितीच महविकास आघाडी सरकारतर्फे अंदाधुंद पद्धतीने शासकीय आदेश काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे. हा प्रकार संशय वाढविणारा आहे. पोलीस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचासुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला ठाऊक आहेच की यापूर्वी पोलीस दलात झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी विनंतीही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आपल्या पत्रात केली आहे.

First Published on: June 25, 2022 3:45 AM
Exit mobile version