शिवाजी आढळराव पाटलांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हात-पाय तोडण्याची धमकी, १७ जणांवर गुन्हा दाखल

शिवाजी आढळराव पाटलांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हात-पाय तोडण्याची धमकी, १७ जणांवर गुन्हा दाखल

शिंदे गटात सामील झाल्याने माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना स्थानिक कार्यकर्त्यांना हात-पाय तोडण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आढळराव पाटलांनी खेड पोलिसांत १७ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवनात’ घडला किस्सा ‘मंगल जोड्या’चा

शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अविश्वास दाखवल्याने नाराज होत त्यांनी शिंदे गटाला आपलेसे केले. यावरून स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन पुकारलं. याप्रकरणी आढळराव पाटलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे,गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभाग प्रमुख अंकुश शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा आज मी मुख्यमंत्री नसलो तरी…, ओबीसी आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावरील खेड येते आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारले. त्यानंतर, आढळरावांच्या घरी जाऊन त्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

First Published on: July 20, 2022 9:11 PM
Exit mobile version