घरताज्या घडामोडीआज मी मुख्यमंत्री नसलो तरी..., ओबीसी आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

आज मी मुख्यमंत्री नसलो तरी…, ओबीसी आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा संपत नव्हता. महाविकास आघाडीकडून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जातोय. तसंच, सत्तेत येताच ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्याने शिंदे-फडणवीस गटात आनंद आहे. याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यांनीही ओबीसी आरक्षणावरून आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती तिला यश मिळालं यासारखे समाधान नाही. (Uddhav Thackeray’s reaction on OBC reservation)

हेही वाचा – ओबीसी राजकीय आरक्षण कसं मिळवलं? फडणवीसांनी दिला तपशील

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असतं आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो.”

ते पुढे म्हणाले की, “हा तिढा अवघड होता पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्दल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले. खरं तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती तिला यश मिळालं यासारखे समाधान नाही.

- Advertisement -

हेही वाचा – आम्हाला श्रेयवादात पडायचं नाही, सर्वांच्या मेहनतीने ओबीसी आरक्षण मिळालं- एकनाथ शिंदे

सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली- शिंदे

ओबीसी समाजाचा विजय झाला. त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याला यश मिळालं. ओबीसी समाजाला शब्द दिला होता, आरक्षण मिळवून देण्याचा तो शब्द आम्ही पाळला. बाठिंया आयोगाचा जो अहवाल आहे तो अतिशय मेहनत करून अत्यंत डिटेलमध्ये न्यायालयात सादर केला. सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवलं – फडणवीस

ओबीसी आरक्षण २०२० मध्येच मिळाले असते. ओबीसी आरक्षणावर स्थगिती आलीच नसती. मात्र, सरकार गंभीर नव्हतं. त्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळली. परंतु आमचं महायुतीचं सरकार येताच आम्ही ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवलं, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत २०१९ पासून आतापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी काय काय घडलं याची सविस्तर माहिती दिली. तसेच, यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकाही केली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -