पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपल्याप्रकरणी गांधी कुटुंबावर कारवाई – फडणवीस

पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपल्याप्रकरणी गांधी कुटुंबावर कारवाई – फडणवीस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. त्यांनी पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांचे २ हजार कोटींची संपत्ती हडपल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसने या चौकशीचा बाऊ न करता चौकशीला सामोरे जावे असं, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Action taken against Gandhi family for seizing property of five thousand freedom fighters – Fadnavasi)

हेही वाचा इम्पिरिकल डेटा गोळा करताना सरकारकडून चूक, ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होणार; फडणवीसांचा इशारा

ईडी हे भाजपचं ब्रम्हास्त्र आहे. ईडीचा गैरवापर करून भाजप खेळी करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तसेच, आज राहुल गांधीची चौकशी सुरू असताना काँग्रेसने देशभर आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली.

हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार, काँग्रेस आणि भाजपात होणार लढत

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधीची चौकशी झाली ती न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली. असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) च्या ही कंपनी १९३० साली स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी तयार केली होती. स्वातंत्र्य संग्रामचं मुखपत्र असलं पाहिजे याकरता पाच हजार सैनिकांनी मिळून नॅशनल हेराल्ड हे मुखपत्र स्थापन करण्यात आलं. या मुखपत्राचे ५ हजार स्वातंत्र्य सैनिक शेअर होल्डर होते.


२०१० साली गांधी कुटुंबाने यंग इंडियन नावाची ५ लाखांची कंपनी तयार केली. आणि एजेएलचे सर्व शेअर्स या कंपनीच्या नावाने ट्रान्सफर करून एजेएलच्या २ हजार कोटी संपत्तीवर आपली मालकी प्रस्तावित केली. पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या २ हजार कोटींची संपत्ती गांधी कुटुंबाने हडप केली, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राहुल गांधी यांची चौकशी लागल्याने देशभर काँग्रेस नेत्यांनी गदारोळ केला आहे. मात्र, त्यांनी या चौकशीचा बाऊ न करता चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप….संजय राऊत

सावरकरांची माफी मागा

राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्डप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला. मात्र, माफी मागायला आम्ही सावरकर नाही असं राहुल गांधी म्हणाले. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावरकरांनी देशहितासाठी माफी मागितली होती. त्यामुळे सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांची माफी मागा, असंही फडणवीस म्हणाले.

आमचे पाचही उमेदवार जिंकून येणार

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाच उमेदवार ठरवण्यात आले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, आमचे पाचही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

First Published on: June 13, 2022 3:34 PM
Exit mobile version