घरताज्या घडामोडीइम्पिरिकल डेटा गोळा करताना सरकारकडून चूक, ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होणार; फडणवीसांचा...

इम्पिरिकल डेटा गोळा करताना सरकारकडून चूक, ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होणार; फडणवीसांचा इशारा

Subscribe

एकाच आडनावाची माणसं वेगवगेळ्या समाजातून आलेली असतात. त्यामुळे महाविकास आघाडीने योग्य पद्धतीने सर्व्हेक्षण करावे. या पद्धतीच्या सर्व्हेमुळे ओबीसी संख्या मोठ्या प्रमाणात घटू शकेल. त्यामुळे त्याचा आरक्षणावर परिणाम होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) संदर्भात जो इम्पिरिकल डेटा (Empirical data) गोळा तयार करण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे, ती पद्धत सदोष असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. या सर्व्हेक्षणाकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे अन्यथा, भाजपला मैदानात उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. (State government failing to collect empirical data, says Devendra Fadnavis)

हेही वाचा – पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडपल्याप्रकरणी गांधी कुटुंबावर कारवाई – फडणवीस

- Advertisement -

एकाच आडनावाची माणसं वेगवगेळ्या समाजातून आलेली असतात. त्यामुळे महाविकास आघाडीने योग्य पद्धतीने सर्व्हेक्षण करावे. या पद्धतीच्या सर्व्हेमुळे ओबीसी संख्या मोठ्या प्रमाणात घटू शकेल. त्यामुळे त्याचा आरक्षणावर परिणाम होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार, काँग्रेस आणि भाजपात होणार लढत

- Advertisement -

सर्व्हेक्षणाची ही पद्धत अशीच चालू राहिली तर माझ्याकडे आलेली आकडेवारी मी सादर करेन. यावेळी त्यांच्या चुकाही दाखवून देऊ, असंही ते म्हणाले.

डेटा गोळा करण्याची पद्धत चुकीची असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील ओबीसींची संख्या खूप कमी झालेली पाहायला मिळणार आहे. यामुळे दुसऱ्या आरक्षणात त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मी सरकारला आताच जागं करत आहे. त्यांची डेटा गोळा करण्याची पद्धत बदलावी, चुकांकडे लक्ष द्यावं. आत्ताच सरकारने जागं होऊन चौकशी केली पाहिजे, अन्यथा ओबीसी समाजाचं खूप नुकसान होणार आहे, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

हेही वाचा काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप….संजय राऊत

या चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करून जर तो न्यायालयात मांडला आणि न्यायालयाने तो डेटा मान्य केला तर ओबीसी समाजाचं अतोनात नुकसान होऊ शकतं. न्यायालयात हा डेटा गेल्यानंतर त्यांना पुन्हा युटर्न मिळणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली तर भाजप स्वतः मैदानात उतरून राज्य सरकारविरोधात कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला.

आमचे पाचही उमेदवार जिंकून येणार

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाच उमेदवार ठरवण्यात आले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, आमचे पाचही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -