मुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांची खंत; म्हणाले, मोठी चूक…

मुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांची खंत; म्हणाले, मोठी चूक…

संग्रहित छायाचित्र

Ajit Pawar on Chief Ministership | मुंबई – २००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. यावेळी या पक्षाला मुख्यमंत्री पदही मिळाले होते. परंतु, राष्ट्रवादीने तेव्हा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. २००४ साली मुख्यमंत्रीपद घेतले नाही, याची खंत अजित पवारांनी आज बोलून दाखवली. एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा – आमचं गुण्यागोविंदानं चाललं असताना तुम्ही त्यांना फितवलं, चंद्रकांत पाटलांचं पटोलेंना प्रत्युत्तर

अजित पवार यांना कुठल्या चुका झाल्या नसत्या तर बरं झालं असतं असं वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी म्हणाले की, ते सांगण्यात आता अर्थ नाही. एक मात्र मोठी चूक वाटते ती म्हणजे २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडायला नको होतं. मी खोटं सांगत नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचं होतं. किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. पण २००४ ला जर मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादीकडे आलं असतं तर ते शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता.

मुख्यमंत्रिपद न घेण्याचा निर्णय कुणी घेतला असा प्रतिप्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, आम्ही तेव्हा ज्युनियर होतो. निर्णय प्रक्रियेमध्ये बोलणारे कोण होते तर प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतेगण होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं, अशी परिस्थिती होती, असं विधान अजित पवार यांनी केलं.

यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी नशिबाची साथ आवश्यक असल्याचेही अजितदादा म्हणाले, आपण कितीही काही म्हटलं तरी प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. पण कुठेतरी नशिबाची पण साथ लागते. सगळ्याच क्षेत्रात ती लागते. देशातही पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसं होती, पण सगळ्यांनाच ते पद मिळतं का. अगदी महापौरपद असेल, मुख्यमंत्रिपद असेल, किंवा आणखी कुठली पदं असतील. सगळ्याच ठिकाणी असं होतं, असं त्यांनी सांगितलं.

First Published on: February 3, 2023 5:01 PM
Exit mobile version