चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर ऑटोरिक्षा सुसाट

चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर ऑटोरिक्षा सुसाट

चिपी विमानतळाची धावपट्टी

मोठा गाजावाजा करत गृहमंत्री दीपक केसरकर यांनी चिपी विमानतळाचे उदघाटन केले. या विमानतळावर विमान काही उडाले नाहीत मात्र विमानासाठी बनवलेल्या धावपट्टीवर रिक्षा धावत सुसाट धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये धावपट्टीवर चक्क रिक्षा चालत असल्याचे दिसत आहे.

यावर्षी गणेशोत्सवादरम्यान १२ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन विमान चिपी विमानतळावर उतरले होते. चेन्नईहून खासगी विमान उडाले त्यानंतर गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर विमान उतरले होते. विमान पाहण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी विमानतळावर चांगलीच गर्दी केली होती. मात्र हे विमान डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चिपी विमानतळावर विमान उतरवले असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

 

First Published on: December 1, 2018 4:39 PM
Exit mobile version