दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? शिवाजी पार्कवर १०१.६ डेसिबल ध्वनी; आवाज फाऊंडेशनकडून अहवाल जारी

दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? शिवाजी पार्कवर १०१.६ डेसिबल ध्वनी; आवाज फाऊंडेशनकडून अहवाल जारी

मुंबई – दसरा मेळाव्यात यंदा कोणाचा आवाज जास्त असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला दोन्ही ठिकाणी तुफान गर्दी झाली होती. समर्थक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यांचा उत्साह आणखी वाढवण्याकरता दोन्ही गटांतील नेत्यांकडून उत्साहपूर्ण भाषणंही करण्यात आली. दरम्यान, दोन्ही गटाच्या आवाजाकडे आवाज फाऊंडेशनचं बारीक लक्ष होतं. दोन्ही गटापैकी उद्ध ठाकरेंच्या भाषणात सर्वाधिकत आवाज होता, असा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला असून त्याबाबत त्यांनी अहवाल सादर केला आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, फडणवीसांची ठाकरेंवर जळजळीत टीका

आवाज फाऊंडेशनच्या मोजणीत शिवाजी पार्कच्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज होता. तर, वांद्र्यातील बीकेसीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला. त्यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबलपर्यंत आवाज गेला होता.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आणि बीकेसीवर मोठ्या आवाजात स्पीकर लावण्यात आले होते. शिवाजी पार्कवर शिवसेनेचे गीत लावण्यात आले होते. तर, बीकेसीवर विविध कलाकारांना बोलावून ऑकेस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे जमलेल्या नागरिकांमध्ये स्फूल्लिंग चेतावण्यासाठी आवाज वाढवण्यात आला होता. तसंच, अनेक नेत्यांनी आक्रमक होऊन, आवेशपूर्ण भाषण केले. यावेळी नेत्यांच्या आवाजात चढ-उतार पाहायला मिळाला.

हेही वाचा – ‘शिवाजी पार्कातला दसरा मेळावा, बीकेसीतला तर इव्हेंट’; सचिन अहिरांचा शिंदेंना टोला

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषण लक्षवेधी ठरलं. इतर नेत्यांपेक्षाही त्यांचं भाषण सरस ठरलं होतं. त्यांच्या  भाषणादरम्यान ७०.६ ते ९३.१ डेसिबलपर्यंत आवाज नोंदवला गेला आहे. तसंच, किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावेळीही ९७ डेसिबलपर्यंत आवाज पोहोचला होता. तर, उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची पातळी ८८.४ डेसिबल होती. खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज ८८.५ डेसिबल नोंदवला गेला आहे.

First Published on: October 6, 2022 4:50 PM
Exit mobile version