बच्चू कडूंची नाराजी येत्या दोन दिवसांत दूर होईल; मुख्यमंत्री शिंदेनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

बच्चू कडूंची नाराजी येत्या दोन दिवसांत दूर होईल; मुख्यमंत्री शिंदेनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

शिंदे – फडणवीस सरकार यांह्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार रखडला त्याचप्रमाणे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा रखडला. यावरून विरोधकांनी टोलेबाजी देखील केली. पण आता रखडलेला हा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल आणि उर्वरित मंत्रिपदांचे 50-50 टक्के वाटप होईल असे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

दरम्यान 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटाच्या नऊ मंत्र्यांचा आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांना दिला होता. पण ऑक्टोबर महिनासुद्धा संपला तरीही तारीही मंत्रिमंडळाचा अद्याप झालेला नाही. तरी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बच्चू कडूंचीही नाराजी दूर होणार

सध्या बच्चू कडू (bachhu kadu) आणि आमदार रवी राणा (ravi rana)यांच्यातील वाद चर्चेत आहे. अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चासुद्धा सुरु आहेत. अशात बच्चू कडू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांची नाराजी येत्या दोन दिवसांत दूर होईल असंही मुख्यमंत्री एकनाथ सिंदे म्हणाले.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापुर्वी अयोध्या दौरा केला होता. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या नंतर एकनाथ सिंदे अयोध्येला जाणार होते असे सांगितले जात होते. याच संदर्भांत विचारले असल्यास लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हे ही वाचा – पंजाबच्या विजयानंतर आपचे लक्ष्य कर्नाटककडे! आप नेत्यांनी मांडले विजयाचे गणित

First Published on: October 31, 2022 8:50 AM
Exit mobile version