भास्कर जाधव म्हणतात, रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर!

भास्कर जाधव म्हणतात, रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर!

मुंबई – ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेड येथे सभा झाली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तिथेच विराट सभा घेतली. उद्धव ठाकरेंचे सर्व मुद्दे खोडून काढत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंसह रामदास कदमावंर टीका केली आहे. रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातील जोकर आहे, अशी मिश्किल टीप्पणी त्यांनी यावेळी केली.

मी विरोधी पक्षनेता म्हजणे मी पुढचा मुख्यमंत्री झालो असतो. म्हणून मला उद्धव ठाकरेंनी पाडलं, असं रामदास कदम म्हणाले होते. रामदास कदम यांचा चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चेहरा आणलात तर ती महाराष्ट्राची घोर चेष्टा असेल. ते मंत्रीच ठाकरे घराण्यामुळे झाले. मंत्री म्हणूनही सभागृहात काय प्रभाव होता हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. त्यांना आता नवीन उपमा देण्याची गरज आहे ते म्हणजे आमच्या कोकणातला जोकर, असं भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा – खेडच्या सभेत रामदास कदमांचे ठाकरेंवर प्रहार

फार अशी शिवराळ भाषा सभेमध्ये चालत नाही फार असं कोणाबद्दल टीका टिप्पणी करून खालच्या स्तरावर बोललेलं आवडत नाही आणि काल आपण बघितला असेल की रामदास कदम यांचं भाषण सुरू झालं आणि सभेतून जी माणसे उठायला सुरुवात झाली एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं संपत आलं ती माणसं उठून निघतच होती थांबायला तयार नाहीत.

आधीच उल्हास त्यात फाल्गून मास. रामदास कदम. आमच्याकरता ते मोठे मॉडेल आहेत. रामदास कदम यांनी मी तात्या विंचू म्हणायचो. तात्या विंचू कसा आहे, कारण गेले आठ महिने ज्या मुलाखती रामदास कदम देत आहेत जे बोलतायेत त्याव्यतिरिक्त रामदास कदम यांच्याकडून एकही नवा मुद्दा समोर आलेला नाही. मला कसं संपवलं?, माझ्या मुलाला कसं संपवलं? मी विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री झालो असतो म्हणून मला उद्धव साहेबांनी संपवलं वगैरे. त्यामुळे रामदास कदम यांना आता नवीन उपमा देण्याची गरज आहे. रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर आहे, असं म्हणावं लागेल, असं भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा – रामदास कदमांची भास्कर जाधव, ठाकरेंवर घणाघाती टीका

First Published on: March 20, 2023 1:21 PM
Exit mobile version