‘होय मी लाभार्थी’जाहिरातीवर मोदी सरकारची कोटींची उधळण

‘होय मी लाभार्थी’जाहिरातीवर मोदी सरकारची कोटींची उधळण

'होय मी लाभार्थी'जाहिरातीवर मोदी सरकारची कोटींची उधळण

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळ परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केंद्राकडून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजही जाहीर नसल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. मात्र दुसरीकडे मोदी सरकार ‘होय मी लाभार्थी’या जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील भाजप सरकारने राज्यातल्या विविध योजनांची जाहिरातबाजी करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा घाट घातला आहे. सरकारी योजनांमुळे लाभार्थींना कसा फायदा झाला त्याची जाहिरातबाजी मराठीतल्या सहा खासगी चॅनेलवरुन केली जाणार आहे.

जाहिरातीसाठी खर्च केले १३ कोटी

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच समोर आला असून या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. या तिन्ही राज्यांमधील पराभवाचा भाजपने मोठा धसका घेतला आहे. त्यामुळे मागील चार वर्षांत भाजप सरकारने सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना कसा फायदा झाला त्याची यशकथा ‘रिपोर्ताज’च्या माध्यमातून लोकांना दाखविण्यात येणार आहे. तसेच लाभार्थींनी कशा प्रकारे योजनांचा लाभ घेभन आपले जीवनमान उंचावले हे दाखवल्यास अन्य लाभार्थींना प्रोत्साहन मिळते आणि योजनांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे यात दाखवण्यात आले आहे. यासाठी मराठीतील काही खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन योजनांचा प्रत्यक्ष लाक्ष घेतलेल्या लाभार्तींच्या अनुभवावर आधारित ‘टीव्ही रिपोर्ताज’ची निर्मीती करुन प्रसारित करण्याची मोदी सरकारची योजना आहे. या योजनेकरता १३ कोटी ३५ लाख रुपयांची उधणपटी केली आहे. या मराठीतल्या सहा खासगी चॅनलवर झळकणाऱ्या जाहिराती ६० सेकंदांच्या असणार आहेत. या योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा ‘होय, मी लाभार्थी’च्या जाहिराती पुन्हा टीव्हीवर झळकणार आहेत.


वाचा – भाजप सत्तेत आल्यानंतर बँकाना चुना; रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील

वाचा – मोदींच्या स्वागताला ‘गाजराचे तोरण’

First Published on: December 19, 2018 1:26 PM
Exit mobile version