घरदेश-विदेशभाजप सत्तेत आल्यानंतर बँकाना चुना; रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील

भाजप सत्तेत आल्यानंतर बँकाना चुना; रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील

Subscribe

मागच्या साडे तीन वर्षात देशातील सरकारी बँकाना मोठ्या उद्योगपतींनी लाखो कोटिंचा चुना लावला आहे.

भाजप २०१४ साली सत्तेवर आले तेव्हापासून आतापर्यंत अनेकांनी भारतीय बँकाना कोट्यवधीचा गंडा घालून परदेशात पोबारा केला आहे. यामध्ये उद्योजक निरव मोदी, विजय माल्ल्या अशा बड्या उद्योगपतींचा समावेश आहे. तपास यंत्रणांना बगल देऊन हे लोक परदेशी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच बँकाना किती कोटींचा चुना लागला आहे, याची आकडेवारी जाहीर केली आहे.

भारतातील राष्ट्रीयकृत बँकाचे २०१५ पासून ते आतापर्यंत जवळपास १.१० लाख कोटी बुडाले आहेत, असा अहवाल आरबीआयने दिला आहे. एक लाख रुपयाहून अधिक रुपयांचा बँक घोटाळा झाला असेल तर त्याची दखल आरबीआयकडून घेण्यात येते. मागच्या तीन वर्षांपासून प्रत्येक वर्षागणिक अशा तक्रारीची संख्या २० टक्कांनी वाढली असल्याचे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -
नीरव मोदीची २५५ कोटींची संपत्ती जप्त

बँकेतील पैशाचा घोटाळा झाल्याबाबत २०१५-१६ आणि २०१७-१८ यावर्षी ४,६९३ ते ५,९१७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच या ३,४१६ इतक्या बँकेतील घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व तक्रारी एकत्र केल्यास ३०,४२० कोटींचा घोटाळा झालेला आहे.

नीरव मोदी प्रकरणात कनिष्ठ बँक कर्मचाऱ्याने लेटर ऑफ अंटरटेकिंग देत दोन ज्वेलर्सच्या पारड्यात हजारो कोटी आंदन दिले होते. त्यानंतर सरकारने अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी नविन नियमावली काढली आहे. या नियमावलीनुसार ५० कोटीच्यावर पैसे थकवलेले बँक खाते एनपीए (Non Performing Assets) म्हणून घोषित केले जाते. अशा खातेधारकाकडून घोटाळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बँकेकडून एक समिती गठित करत त्याचा तपास करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -