‘दार उघड उद्धवा दार उघड’; भाजपच राज्यभर घंटानाद आंदोलन

‘दार उघड उद्धवा दार उघड’; भाजपच राज्यभर घंटानाद आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे, देवस्थाने मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे उद्योग, व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील मंदिरे, देवस्थान सुरु करावीत, अशी मागणी भाजप आणि अध्यात्मक समन्वयकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडीने राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

घंटानाद आंदोलनास सुरुवात

मंदिरं सुरु करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते गावागावातील मंदिरांसमोर आंदोलन करणार आहेत. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. पण, महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरे खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.

राज्यभर कुठे कुठे घंटानाद आंदोलन?

First Published on: August 29, 2020 10:54 AM
Exit mobile version