Video: फडणवीसांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांचा गेला तोल

Video: फडणवीसांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांचा गेला तोल

Video: फडणवीसांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांचा गेला तोल

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची बुधवारी सोलापूरमध्ये भरपत्रकार परिषदेत अचानक खुर्चीचा पाय तुटल्यामुळे तोल गेला. यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना वाचवलं. ही घटना शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचं सांगितलं जातं आहे. फडणवीसांबद्दल बोलत असताना नेमकी ही खुर्ची तुटली. या घटनेच्या टायमिंगमुळे चंद्रकांत पाटील सध्या चर्चेत आले आहेत.

सोलापूरमध्ये शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत बोलत असताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडून कुठे जाणार नाहीत याचं वेळी नेमका खुर्चीचा पाय तुटण्याचा आवाज आला आणि चंद्रकांत पाटील यांचा तोल गेला. सुदैवाने त्यावेळेस त्यांनी बाकाला पकडलं आणि त्यांना जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मागून येऊन पकडलं. त्यामुळे ते पडता पडता वाचले. या पत्रकार परिषदेत सुभाष देशमुख देखील उपस्थित होते.

या घटनेच्यावेळी चंद्रकांत पाटील यांना हसू आवरलं नाही. ते लगेच म्हणाले की, बघा खातं बदल्यामुळे काय काय प्रोब्लेम होतात. त्यानंतर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली.


हेही वाचा – शिवतीर्थावरील शपथविधीचा नेमका खर्च किती झाला?


 

First Published on: February 12, 2020 6:10 PM
Exit mobile version