राज्यातील सर्व कंत्राटी कामगार संपावर जाणार?

राज्यातील सर्व कंत्राटी कामगार संपावर जाणार?

राज्यातील सर्व कंत्राटी कामगार संपावर जाणार?

मेगा भरती कायम केली नाहीत तर राज्यातील सर्व कंत्राटी कामगार संपावर जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व कंत्राटी कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे आणि धरणे, काम बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी नाशिक ते मुंबई लॉंग मोर्चा करणार असल्याची घोषणा केली आहे. कामगार नेते राजू देसले म्हणाले की, देशातील सर्व संघटना एक देशव्यापी संप करणार आहेत. त्यात राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना यांनी ९ जानेवारी रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे आणि धरणे आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर सर्व कंत्राटी कामगार काम बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर चळवळीसाठी करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मेगा भरती विरोधात कंत्राटी कर्मचारी महासंघाची याचिका

राज्यातील ५२ संघटनांचा पाठिंबा

कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिका करते मुकूंद जाधवर यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई पर्यंत लाँग मार्च काढण्यात येईल, अशी घोषणा केली. राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांना संपूर्ण आंदोलन, मोर्चे, धरणे आदींबाबत मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध ५२ संघटनांचा त्यांना पाठिंबा आहे.


हेही वाचा – ‘मेगा’ भरतीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा

First Published on: December 23, 2018 9:17 PM
Exit mobile version