पुण्यात दिवसभरात १,२४५ नव्या रुग्णांची नोंद

पुण्यात दिवसभरात १,२४५ नव्या रुग्णांची नोंद

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १ हजार २४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहते. पुण्यात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ८४४ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

दिवसभरात २१ बाधित रुग्णांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दिवसभरात २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत ८९० बाधितांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासह जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ६६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १८ हजार ३९५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सोमवारी पुणे महानगर पालिका क्षेत्रात दिवसभरात ८६१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे, आतापर्यंत २२ हजार ३८१ कोरोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात १५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ७३० रुग्णांना कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांचा आकडा हा ७ लाखांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण २२ हजार २५२ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून या रुग्णांसह देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ७ लाख १९ हजार ६६५ वर पोहोचला आहे. तर एकूण कोरोना रुग्णांमध्ये २ लाख ५९ हजार ५५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


Corona: धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये वृद्धाने केली आत्महत्या

तसेच, राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २६ झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. तसेच २४ तासांत ३ हजार ५२२ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५४.३७ % एवढा झाला आहे.

First Published on: July 7, 2020 4:21 PM
Exit mobile version