NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी

NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी

अंमली पदार्थ विरोधी (NCB) पथकाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यासंदर्भात त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Death threat to former divisional director of NCB Sameer Wankhede)

हेही वाचा – समीर वानखेडे आता अॅक्शन मोडवर, नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीची तक्रार

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याविरोधात समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून धमकी मिळाली आहे. ट्विटरद्वारे समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

क्रुझ ड्रग्सप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडेविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी जात बदलल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी जात पडताळणी समितीकडे वानखेडेंविरोधात तक्रार केली. प्रशासकीय नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. ते धर्माने मुस्लिम समाजातील असून प्रशासकीय नोकरीसाठी त्यांनी हिंदू महार हे जात प्रमाणपत्र दिले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.

हेही वाचा – जात प्रमाणपत्र समितीची समीर वानखेडेंना क्लीन चिट

दरम्यान, याप्रकरणी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लिन चीट दिली. त्यामुळे नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांनी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली.

First Published on: August 19, 2022 12:45 PM
Exit mobile version