घरताज्या घडामोडीजात प्रमाणपत्र समितीची समीर वानखेडेंना क्लीन चिट

जात प्रमाणपत्र समितीची समीर वानखेडेंना क्लीन चिट

Subscribe

कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत राहिलेले एनसीबीचे माजी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शनिवारी मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडे हे जन्माने हिंदूच असून ते मुस्लीम असल्याचे सिद्ध होत नाही, अशी क्लीन चिट जात प्रमाणपत्र समितीने समीर वानखेडेंना दिली आहे.

राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा प्रमाणपत्र समितीकडे गेले होते. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हणत तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळत समीर वानखेडे यांना क्लीन चिट दिली आहे.

- Advertisement -

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाहीत. त्यामुळे वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्वीकार केल्याचे सिद्ध होत नाही. यावरून समीर वानखेडे हे हिंदू महार ३७ अनुसूचित जातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. यावरून समीर वानखेडेंविरोधातील आरोप सिद्ध होत नसल्याचे म्हणत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रार फेटाळून लावली आहे. दरम्यान, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळताच समीर वानखेडे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सत्यमेव जयते, असे म्हटले आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -