धक्कादायक! गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांची आत्महत्या

धक्कादायक! गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यात एकिकडे राजकारणी सत्तासंघर्षामध्ये आणि पक्षाचे चिन्ह, नाव निवडणुका यामध्ये व्यस्त असून दुसरीकडे मात्र शेतकरी आर्थिक संकटात अडकल्याने आत्महत्या करत आहे. गेल्या 9 महिन्यात तब्बल 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील दोन महिन्यात राज्याच्या अनेक भागांत पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. (due to financial issues state 756 farmers committed suicide in last 9 months)

मुसळधार पावसामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पिकांचे नुकसान झाल्याने गळफास आणि विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यावर 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

सरकारने आत्महत्या थांबवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, अद्यापही त्यांना मदत मिळत नसल्याने, शेतीकरी टोकाचे पावले उचलत आहेत. ज्या सप्टेंबर महिन्यात सत्तसंघर्षाचा उत आला होता, त्याच महिन्यात तब्बल मारठवड्यातील तब्बल 90 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली.

गेल्या 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर काळातील आत्महत्या


हेही वाचा – शिंदे गट ठाकरे गटाच्या रडारवर, पण भुजबळ, राणे, राज ठाकरेंबाबत भूमिका सौम्य

First Published on: October 11, 2022 12:19 PM
Exit mobile version