पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 1 वारकरी ठार, 30 जखमी

पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 1 वारकरी ठार, 30 जखमी

राज्यभरातील वारकरी पंढपूरच्या वारीच्या दिशेने डोळे लावून आहेत. पण या वारीपूर्वी एक दु:खद घटना समोर आली आहे. साताऱ्यात वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला आहे. यात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर 30 जण जखमी झाले आहेत. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ इथं खडाळा गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. एका भरधाव आयशर ट्रेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात एक वारकरी ठार झाला आहे तर 30 वारकरी जखमी आहेत. यातील 11 वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. मायप्पा कोंडिबा माने (वय 45) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. तर मारूती भैरवनाथ कोळी (वय 40) मृत्यूशी झुंज देत आहेत. हा अपघात रविवारी रात्री 19 जून रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले लोहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूरला पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती. ही दांडी शिरवळ खंडाळा गावाच्या हद्दीत पोहचताच आयशर ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. यावेळी ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडल्या होत्या. यामध्ये महिलांसह 43 वारकरी ट्रँक्टर ट्रॉलीमध्ये प्रवास करत होते. मात्र अचानक झालेल्या या अपघातामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक पलडी झाला. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. तर ट्रॉलीचा पाठीमागच्या बाजूने चक्काचूर झाला आहे.

या अपघातात तीस वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी जखमींना तातडीने युवक आणि नागरिकांच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातातील गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेची नोंद घेत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.


50 वर्षीय बीएमसी सफाई कर्मचाऱ्याने दिली 10 वीची परीक्षा; पहिल्याच प्रयत्नात झाला उत्तीर्ण


 

First Published on: June 19, 2022 12:56 PM
Exit mobile version