घरमुंबई50 वर्षीय बीएमसी सफाई कर्मचाऱ्याने दिली 10 वीची परीक्षा; पहिल्याच प्रयत्नात झाला...

50 वर्षीय बीएमसी सफाई कर्मचाऱ्याने दिली 10 वीची परीक्षा; पहिल्याच प्रयत्नात झाला उत्तीर्ण

Subscribe

मुंबईत राहणाऱ्या 50 वर्षीय बीएमसी सफाई कामगाराने पहिल्याच प्रयत्नात 10 वीची परीक्षआ पास केली आहे. कुंचीकोर्वे मशन्ना रामाप्पा असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. निकाल जाहीर होताच रामप्पा म्हणाले की, मला 57 टक्के मिळाले आहेत. दिवसातून मी ३ तास अभ्यास करायचो. माझी मुले पदवीधर आहेत. त्यामुळे त्यांनीही मला माझ्या अभ्यासात मदत केली. मी अभ्यास सुरु ठेवणार असून मला आता 12 वीची परीक्षाही द्यायची आहे.

रामप्पा पुढे म्हणाले की, मला आधीच शिक्षण घेण्याची इच्छा होती, परंतु घरची आर्थिक परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांमुळे मी दहावीची परीक्षा देऊ शकलो नाही. पगार चांगला नव्हता यात अभ्यासही कमी झाला होता. म्हणून यावर्षी मी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

रामप्पा म्हणाले की, बीएमसीचे अधिकारी, माझ्या कुटुंबीयांनी मला अभ्यासासाठी प्रेरित केले. बीएमसीचे सहकारी आणि अधिकारी म्हणायचे की चांगल्या पगारासाठी अधिक शिक्षित असणे आवश्यक आहे, म्हणून मी 10वीला प्रवेश घेतला आणि दैनंदिन कामासह अभ्यास करायचो. माझ्या मुलांनीही माझ्या अभ्यासात खूप मदत केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र SSC (10वी) बोर्ड परीक्षा 2022 चा निकाल गुरुवारी म्हणजेच 17 जून रोजी जाहीर केला. यंदा एसएससी बोर्डाच्या परीक्षेत एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी 97.96 टक्के उत्तीर्ण होऊन मुलांपेक्षा बाजी मारली आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.06 टक्के आहे.


मुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट मोहीम; पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला गृहमंत्री, अक्षयकुमारची भेट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -