‘इन्कमिंग’च्या ‘मृगजळा’तच वावरायचे असेल तर… ठाकरे गटाचा शिंदे गट-भाजपाला टोला

‘इन्कमिंग’च्या ‘मृगजळा’तच वावरायचे असेल तर… ठाकरे गटाचा शिंदे गट-भाजपाला टोला

If we want to live in the mirage of 'incoming'... Thackeray group criticizes Shinde-BJP government

मुंबई : भाजपा-शिंदे गटातील अनेक स्वयंघोषित मातब्बरांचे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC election) वर्षानुवर्षे गाडलेले तंबू मतदारांनी उखडून फेकले. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Sena-BJP government) सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे (Maharashtra Vikas Aghadi) जोरदार ‘इन्कमिंग’ आणि शिंदे गट-भाजपचे जोरदार ‘आऊट गोइंग’ होत आहे. परंपरागत मतदारांपासून नवीन मतदारांपर्यंत, शेतकरी-कष्टकऱ्यांपासून पदवीधर-सुशिक्षित मतदारांपर्यंत सगळेच भाजपपासून ‘आऊट गोइंग’ करीत आहेत हेच वास्तव आहे. तरीही कोणाला या वास्तवाकडे दुर्लक्ष करून ‘इन्कमिंग’च्या ‘मृगजळा’तच वावरायचे असेल तर त्यांना शुभेच्छा, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाने लगावला आहे.

हेही वाचा – एकमेव पंतप्रधान पाहिले जे 9 महिने ‘काम की बात’ करत नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ‘क्रमांक एक’चा दावा करणाऱ्या भाजपा-शिंदे गटाला वास्तवात महाविकास आघाडीपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या होत्या. सुमारे 225 ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या होत्या, तर भाजपा-शिंदे गटाचा हाच आकडा 180च्या आत होता. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही चारपैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. सर्व जागा जिंकण्याच्या गमजा मारणाऱ्या भाजपाला जेमतेम एक जागा मिळाली होती. त्यातही भाजपाच्या दोन परंपरागत मतदारसंघांत महाविकास आघाडीचे ‘इन्कमिंग’ करण्याचा चमत्कार सुशिक्षित मतदारांनी करून दाखवला होता, असे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे.

मध्यंतरी भाजपाच्या मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही याच चमत्काराची पुनरावृत्ती झाली. पुण्यातील कसबा मतदारसंघ (Kasba Peth Assembly seat) हा भाजपाचा बालेकिल्ला तब्बल 29 वर्षांनी ढासळला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली. अलीकडेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीतही मतदानाच्या आऊट गोइंगने भाजपा-मिंधे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. राज्यातील बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले, याकडे ठाकरे गटाने या अग्रलेखातून लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी कोकणात रिफायनरी आणायची; नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

First Published on: May 2, 2023 8:06 AM
Exit mobile version