बैलगाडा शर्यतीदरम्यान दुर्घटना; बैल उधळला अन् चिमुकल्याच्या अंगावरून…

बैलगाडा शर्यतीदरम्यान दुर्घटना; बैल उधळला अन् चिमुकल्याच्या अंगावरून…

In Kalamundi of Chiplun taluka A five year old boy is seriously injured after being run over by a bullock cart

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात बैलगाडा मालकांनी जल्लोष केला आहे. आता याच बैलगाडा शर्यतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान एक दुर्घटना घडली आहे. कोकणात शर्यतीदरम्यान एक उधळलेला बैल 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेल्याचा प्रकार घडला आहे. चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ( In Kalamundi of Chiplun taluka A five year old boy is seriously injured after being run over by a bullock cart )

चिपळूण तालुक्यातील कळमुंडीमध्ये बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागलं आहे. अंगावरुन बैलगाडा गेल्यामुळे पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. त्याला कराडमधील रुग्णालयात उपाचर सुरु असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जखमी झालेला मुलगा हा चिपळूणमधील कोंढे गावातील रहिवासी आहे. तो बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी आला होता.

अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यत ही जीवावर बेतत असल्याचं दिसून आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, आता पुन्हा एकदा या शर्यतींना सुरुवात झाली आहे. त्यात चिपळूणमधून लगेचच एक दुर्घटना समोर आली. स्पर्धेदरम्यान पाच वर्षांच्या मुलाच्या अंगावरुन बैलगाडी गेली. यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. उधळलेल्या बैलाने लहान मुलाला तुडवले. त्यामुळे तो जखमी झाला. हा धक्कादायक प्रकाराने हळहळ व्यक्त होत आहे.

( हेही वाचा: निवडणुका घ्या मग कळेल पोपट कुणाचा मेलाय, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला )

आता या घटनेमुळे बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी जोखीम पत्करुन होणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. अलिकडेच दोन महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यात अलिबाग येथेही समुद्र किनाऱ्यावरती आयोजित बैलगाडा स्पर्धेदरम्यान एका इसमाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता

 

First Published on: May 19, 2023 10:41 AM
Exit mobile version