घरताज्या घडामोडीनिवडणुका घ्या मग कळेल पोपट कुणाचा मेलाय, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

निवडणुका घ्या मग कळेल पोपट कुणाचा मेलाय, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर असताना महाविकास आघाडीवर टीका केली होती. पोपट मेलाय हे महाविकास आघाडीला चांगलच माहिती आहे. तरीही ते म्हणतात पोपट मान हलवत नाही. हात पाय हलवत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पोपट कोणाचा उडतोय हे फडणवीसांना लवकरच कळेल. तसंच कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे कळेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे चित्र दिसलं ही फक्त झलक आहे. मनपाच्या ताबोडतोब निवडणुका घ्या मग पोपट कुणाचा मेलाय हे जनता तुम्हाला दाखवेल, असा टोला खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला.

- Advertisement -

घटनाबाह्य सरकारचा पोपट मेलाय. पण त्या पोपटाला ऑक्सिजन देणाऱ्यांना परत एकदा बेकायदेशीरपणाने करताहेत. आम्हाला विधानसभा अध्यक्षांचा अत्यंत आदर आहे. ते घटनात्मक पदावर बसलेले आहेत. असाच आदर आम्हाला राज्यपालांविषयी होता. परंतु राहुल नार्वेकर हे फार मोठे घटनातज्ज्ञ आहेत. ते नक्कीच न्याय देतील. पण घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती ही राजकीय असते. त्यामुळे येथे धोका असतो. विधानसभा अध्यक्ष हे महात्मा आहेत. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

मविआमध्ये जागांविषयी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून 2019 मध्ये लोकसभेच्या ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्या आम्ही लढवणारच, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

१६ आमदार अपात्र ठरतील की नाही यावर मी भाष्य करणार नाही. हा विषय सन्मानीय विधानसभा अध्यक्षांकडे आहे. ते कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेतलीच. पण एक कायद्याचा अभ्यासक म्हणून गेली २५ वर्षे राजकारणात काम करतोय. या नात्याने मी सांगेन की, मविआला चांगलच माहिती आहे की पोपट मेला आहे. तरीही तो मान हलवत नाही. हात पाय हलवत नाही, असे ते सांगत आहेत. शेवटी त्यांनाही त्यांच्या लोकांना काही तरी सांगावं लागतं. त्यामुळे ते अजूनही आशेवर आहेत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.


हेही वाचा : Shivsena UBT : 2019 लोकसभेत जिंकलेल्या जागा लढवणारच, संजय राऊतांचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -