अख्तर, शाहांच्या समर्थनार्थ विविध क्षेत्रातील १५० मान्यवर उभे

अख्तर, शाहांच्या समर्थनार्थ विविध क्षेत्रातील १५० मान्यवर उभे

अख्तर, शाहांच्या समर्थनार्थ विविध क्षेत्रातील १५० मान्यवर उभे

ज्येष्ठ कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची तुलना अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीशी केली आहे. या वक्तव्यावरून अख्तरांवर संघ आणि भाजप्रणीत संघटनांनी टीकेची झोड उठवली. तर अनेकांनी अख्तरांवर चिखलफेक केली. इकतेच नाही तर जावेद अख्तरांना जीवे मारण्याचा धमक्याही दिल्या जात आहेत. मात्र विविध क्षेत्रातील १५० मान्यवर आणि विचारवंतांनी अख्तरांच्या समर्थनार्थ उभे राहत या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध आणि नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांचा मताधिकार जपला गेला पाहिजे, याबद्दल आग्रही असल्याचे नमूद करत जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. तिस्ता सेटलवाड, अमिर रिझवी, आनंद पटवर्धन, अंजुम राजाबाली अशा विविध मान्यवरांनी यात सहभाग घेतला आहे.

जगभरातील ख्रिश्चन, शीख, हिंदू असो वा मुस्लीम या सर्व उजव्यांच्या विचारसरणीत समानता आहे. जेव्हा कुंटुंब, त्यांच्या समाजातील स्त्रियांचे त्यांच्या देखत काय स्थान आहे. यावर त्यांची मते जाहीर केली जातात तेव्हा त्यांची कडवी मानसिकता अधिकच स्पष्ट होते. तालिबान्यांची मानसिकता अधिकच हिंसक आणि टोकाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून संघ परिवाराकडून होणाऱ्या हिंसक घटनाही हिंदू तालिबानच्या दिशेने पहिले पाऊल आहे. अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सद्यपरिस्थितीचे वर्णन केले आहे. जावेद अख्तरांचा एका मुलाखतीतील वक्तव्यावरून बराच वादंग सुरु आहे, याचवेळी नसीरुद्दीन शाह यांच्या जुन्या मुलाखतीतील वक्तव्ये समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या दोन्ही घटनांमधील योगायोग दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे असेही त्यांनी नमूद केले.

शाह यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना मुस्लीम समाजाकडून टीकेची लक्ष्य करण्यात आले. भारतातील इस्लाम हा जगभरातील इस्लामी धर्मविचारांपेक्षा वेगळा आहे. आपल्याला आपल्या धर्मात आधुनिक विचार आणि सुधारणा हव्यात की कर्मठ धर्मविचार वाढवायचा आहे? याचा विचार व्हायला हवा, असे मत शाह यांनी व्यक्त केल होते. शाह यांचे वक्तव्य आणि जावेद अख्तर यांनी मांडलेल्या मतांमधून समाजातील महत्त्वाचे विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हणत विचारवंतांनी त्यांच्या भूमिका पाठींबा दिला आहे.


 

First Published on: September 8, 2021 12:17 PM
Exit mobile version