नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या BSF जवानाला अटक, मोठ्या प्रमाणता शस्त्रास्त्र साठा जप्त

नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या BSF जवानाला अटक, मोठ्या प्रमाणता शस्त्रास्त्र साठा जप्त

नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या BSF जवानाला अटक, मोठ्या प्रमाणता शस्त्रास्त्र साठा जप्त

नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या बीएसएफ जवानाला अटक करण्यात आली आहे. झारखंड दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून मोठ्या प्रमाणातही शस्त्रास्त्रेही जप्त कऱण्यात आली आहेत. झारखंड एटीएसने अतिरेकी आणि गुन्हेगारांच्या संघटित टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या ३ जणांना अटक केली आहे. या कारवाईत जप्त केली असलेली अनेक शस्त्रे ही देशातील सशस्त्र दलाची असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सीआरपीएफ जवान अविनाश आणि त्याच्या साथीदारांकडून ही माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने कारवाई केली.

झारखंडमध्ये नक्षलवादी आणि गुन्हेगारी टोळीला शस्त्रे आणि बुलेटचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक बीएसएफ काँस्टेबल, बीएसएफ निवृत्त हवलदार आणि इतर दोन जणांचा समावेश आहे. पोलिसांना एकूण १४ पिस्तुल, २१ मॅग्जीन आणि ९,२१३ राउंड बुलेट, डेटोनेटर, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे. एटीएसने या आरोपींना पंजाब आणि महाराष्ट्राच्या सीमेवरुन अटक केली आहे.

बिहार झारखंडमध्ये एटीएसची छापेमारी

झारखंडमध्ये नक्षली आणि गुन्हेगारी टोळीला हत्यारे पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यावर झारखंड एटीएस पथकाने बिहार, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये छापेमारी सुरु केली आहे. या टोळ्यांना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी एटीएसने झारखंडसह बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्रामध्ये संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा : कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांकडे, दहशतवाद्यांना मदत केल्याचा समशेर खान पठाण यांचा आरोप


 

First Published on: November 25, 2021 6:12 PM
Exit mobile version