कांजुरमार्ग कोरोना केंद्र बंद होणार; वैद्यकीय साहित्य अन्यत्र हलविणार

कांजुरमार्ग कोरोना केंद्र बंद होणार; वैद्यकीय साहित्य अन्यत्र हलविणार

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत काहीशी वाढ होत आहे. मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. अशातच पालिकेने गोरेगाव पाठोपाठ आता कांजूरमार्ग येथील कोरोना केंद्र बंद करून ते पाडण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग कोरोना केंद्रातील वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथील जागेत व अन्य रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. (Kanjurmarg Corona Center to be closed; Medical supplies will be moved elsewhere)

महापालिकेने सदर कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. योग्य प्रतिसाद देणाऱ्या व पात्र ठरणाऱ्या कंत्राटदाराला हे काम देण्यात येणार आहे.

हेही वाचा – राज्यात कोरोना काळात बालकामगारांच्या संख्येत वाढ

मुंबई मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून या कोरोनाच्या संसर्ग अधूनमधून वाढल्याने कोरोनाची पहिली, दुसरी व तिसरी लाट येऊन गेली. या कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये गरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंत अशा अनेकांचा मृत्यू झाला. त्यात सरकारी, पालिका कर्मचारी, खासगी कंपनीतील कामगार, अधिकारी आदींचा समावेश होता.

हेही वाचा – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, दोन रूग्णांचा मृत्यू

मात्र ज्या वेळी कोरोना वाढीस लागला त्यावेळी राज्य शासनाने व पालिकेने दहिसर, कांजूरमार्ग, भायखळा, गोरेगाव, बीकेसी आदी ठिकाणी जंबो कोरोना केंद्र उभारले. त्याचा पालिका आरोग्य यंत्रणेला चांगला उपयोग झाला व या जंबो कोरोना केंद्रात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. मात्र आता कोरोनाचा कहर कमी झाला असून पालिकेने दहिसर, गोरेगाव जंबो कोरोना केंद्रापाठोपाठ कांजूरमार्ग येथील जंबो कोरोना केंद्र बंद करण्याचा व ते पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: June 15, 2022 9:16 PM
Exit mobile version