घरताज्या घडामोडीराज्यात कोरोना काळात बालकामगारांच्या संख्येत वाढ

राज्यात कोरोना काळात बालकामगारांच्या संख्येत वाढ

Subscribe

कोरोनाच्या मागील २ वर्षांच्या काळात राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील बालकामगारांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली.

राज्यासह देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. एकिकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) नोकऱ्या जात होत्या, तर दुसरीकडे बालकामगार वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोरोनाच्या मागील २ वर्षांच्या काळात राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील बालकामगारांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली. विषेश म्हणजे राज्याच्या जालना, नंदुरबार आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये अधिक बालकामगार असल्याची माहिती ‘क्राय’ या संस्थेनं आपल्या अहवालात नमूद केली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे जालना, लातूर, वर्धा, अहमदनगर, नंदुरबार आणि परभणी या सहा ग्रामीण जिल्ह्यातील बालमजुरीत असलेल्या तसेच, शेतीमध्ये काम करणाऱ्या मुलांची संख्या वाढली.

हेही वाचा – पुणेकरांनो सावधान, BA2 रुग्णसंख्येत वाढ

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, २०२० पासून वाढली असल्याचे ‘क्राय’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. बालकामगारांचा एकूण आकडा २०२० मध्ये २५५६ वरून २०२१ वर्षात ३३५६ वर गेला आहे. तसेच, २०२२ या वर्षात ही आकडेवारी ३३०९ वर गेली आहे.

याबाबत CRY (पश्चिम) चे संचालक क्रियान रबाडी यांनी अधिक माहिती दिली. शाळा बंद होणे, ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईल फोनचा अभाव, नोकरी गमावल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण तसेच सरकारी बससेवेच्या प्रदीर्घ संपामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाला. त्यामुळे या सर्वाचा फटका विद्यार्थ्यांना बसला.

राज्याची सध्याची कोरोनाची आकडेवारी

राज्यात आज (Maharashtra Corona Update) पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार २४ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ३ हजार २८ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ते घरी परतले आहेत. परंतु राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के इतका झाला आहे.

राज्यामध्ये एकूण १९ हजार २६१ सक्रिय रुग्णांची (Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यामध्ये आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.८९ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे बीए ५ व्हेरिएंटच्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणचे आहेत.


हेही वाचा – देशभरात ८,८२२ नवीन कोरोना रुग्ण, १५ जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -