घरताज्या घडामोडीराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, दोन रूग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, दोन रूग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज (Maharashtra Corona Update ) पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार २४ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ३ हजार २८ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ते घरी परतले आहेत. परंतु राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के इतका झाला आहे.

राज्यामध्ये एकूण १९ हजार २६१ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यामध्ये आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.८९ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे बीए ५ व्हेरिएंटच्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणचे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यात २३ नवीन संवर्धन राखीव, ५ अभयारण्ये होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबईत आज २ हजार २९३ इतक्या नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर १७६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत १२ हजार ३४१ रुग्ण आहेत. मागील २४ तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १० लाख ५३ हजार ९६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका झाला आहे. गेल्या १० दिवसात नवी मुंबईत जवळपास तीन हजार कोरोना रूग्णांची भर पडली आहे.

- Advertisement -

मागील अनेक दिवसांपासून देशभरातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात नवे ८,८२२ रुग्ण आढळले आहेत. तसेच, १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५३ हजार ६३७ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १५ जणांपैकी ७ केरळ, २ दिल्ली, ४ महाराष्ट्र आणि १ राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आहेत.


mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -