महाराष्ट्रात नोकरी हवी, यूपीत मराठी शिकवा; कृपाशंकर सिंहांचे मुख्यमंत्री योगींना पत्र

महाराष्ट्रात नोकरी हवी, यूपीत मराठी शिकवा; कृपाशंकर सिंहांचे मुख्यमंत्री योगींना पत्र

उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) तरुणांना महाराष्ट्रात (Maharashtra) सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी सोपे जावे यासाठी भाजपा नेते कृपाशंकर सिंह (kripashankar singh) यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी उत्तर प्रदेशात मराठी (Marathi Language) शिकवण्याची विनंती केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (kripashankar singh letter to cm yogi adityanath for teach marathi in uttar pradesh school for jobs in maharashtra)

विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची मागणी

उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची मागणी कृपाशंकर सिंह यांनी केली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, कृपाशंकर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर उत्तर प्रदेश सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते. शिवाय, प्रायोगिक तत्वावर वाराणसीमध्ये (Varanasi) मराठी विषय शिकवणार असल्याचे समजते.

हेही वाचा – योगी सरकारच्या अर्थसंकल्पात युवकांच्या नोकरीबाबत मोठी घोषणा

कामगार आणि मनुष्यबळाची संख्या अधिक

उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यात वाद निर्माण होत असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येणाऱ्या कामगार आणि मनुष्यबळाची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील रोजगारांच्या संधी मर्यादित होतात. परिणामी बाहेरील मजुरांमुळे राज्यातील कामगारांना नोकरीच्या संध्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे आता सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशातील रस्त्यांवरील धार्मिक कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

राज्यातील तरुणांना नोकरीच्या संध्या मर्यादीत

दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) ही परप्रांतीय मजुरांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यातील तरुणांना नोकरीच्या संध्या मर्यादीत उपलब्ध होत असल्याने त्यांनी परप्रांतीयांना मारहाण करत आपल्या राज्यात जाण्याची मागणी केली होती. त्याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरूवातील मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्रातील परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आणि परप्रांतीयांना महाराष्ट्रात येण्यापासून अडवण्यासाठी आंदोलन केली होती.


हेही वाचा – “एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

First Published on: June 8, 2022 10:24 AM
Exit mobile version