मत द्या! दारूबंदी उठवते

‘दारूबंदी’ सर्वसामान्यांच्या आयुष्यातील नेहमीचाच शब्द. खरं तर मतांच्या आशेना का होईना राजकारण्यांनी देखील दारूबंदीची मागणी केली आणि समर्थन केले आहे. परंतु, दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदार संघात एका उमेदवाराने चक्क ‘मत द्या, दारूबंदी उठवते’, असे जाहिरनाम्यातून मतदारांना आश्वासन दिले आहे. ‘आम्हाला वाटते की, चिमूर विधानसभा मतदार क्षेत्रातील जनतेला कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला पाहिजे. दारूबंदी केल्याने समाजात सुधारणा होईल, असे ज्यांना वाटत होते त्यांनी गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघावा, असे चिमूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.

दारू प्यायलेत तर त्यांचे दारूसाठी वाद होणार नाहीत

‘समाजाचा अभ्यास करता दारू पिणे ही सामाजिक प्रथा असल्याचे जाणवते. जोपर्यंत दारूबंदीला समाज मान्यता मिळत नाही तोपर्यंत दारूबंदी प्रत्यक्षात आणणे अशक्य आहे. लोकांना चोरून लपून दारू पिण्यास, विकण्यास भाग पाडण्याशिवाय दारूबंदीने दुसरे काहीही साध्य झालेले नाही. माझ्या क्षेत्रातील जनता जनता ही चोरून लपून आणि दुप्पट तिप्पट भावांनी दारू पिताना बघून मला फार दु:ख होते’, असे उमेदवार यांनी म्हटले आहे. दारूमुळे कुटूंब उद्ध्वस्त होतात, असा एक तर्क आहे. कदाचित तो खरा देखील आहे. पण दारूबंदी हा त्यावरचा उपाय नाही. नवरा बायको पोरं मिळून तंबाखू खातात, त्याचप्रमाणे नवरा बायको मुलांनी मिळून दारू पिणे हा त्यावरचा एक योग्य मार्ग आहे. नवरा-बायको आणि मुलांनी एकत्र बसून आपल्याच घरात दारू प्यायलेत तर त्यांचे दारूसाठी वाद होणार नाहीत. तसेच ते दारू देखील प्रमाणात पिणार आणि आणि घरीच चकना बनवल्याने आमलेट-बुर्जी खाऊन त्यांचे आरोग्य देखील सुधारेल, अशी कल्पकता या जाहिरनाम्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता या उमेदवारांचे आश्वासन मतदारांना किती आपलंस वाटतयं आणि उमेदवाराची ही अनोखी घोषणा त्याच्या पथ्यावर पडतेय, हे निकालानंतरच समजेल.


हेही वाचा – #मोदी_परत_जा; महाराष्ट्रातून मोदींना विरोध


 

First Published on: October 13, 2019 8:32 PM
Exit mobile version