घरट्रेंडिंग#मोदी_परत_जा; महाराष्ट्रातून मोदींना विरोध

#मोदी_परत_जा; महाराष्ट्रातून मोदींना विरोध

Subscribe

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना '#मोदी_परत_जा' हा हॅशटॅग ट्रेण्डिंगला आहे. त्यामुळे मोदी दौऱ्याला महाराष्ट्रातून विरोध होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रत्येक पक्षांकडून वेगवेगळ्या ट्रिक वापरुन प्रचार केला जात आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. मात्र, या प्रचार सभे दरम्यान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध केला जात असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

#मोदी_परत_जा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच #मोदी_परत_जा हा मराठी हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. दरम्यान, मोदींच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सोशल नेटवर्किंवरुन विरोध होताना दिसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेकांनी या हॅशटॅगच्या माध्यमातून मोदींच्या दौऱ्याला विरोध करत आपला रोष व्यक्त करताना दिसत आहे.

- Advertisement -

बऱ्याच नेटकऱ्यांनी ‘मोदी परत जा’, असे मराठीतून म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलण्यापेक्षा राज्यातील समस्यांवर बोलावे, अशी मागणी देखील केली आहे.

प्रचारासाठी आजचा रविवार शेवटचा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा रविवार हा शेवटचा रविवार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक लोक प्रचारसभांमध्ये जातात किंवा घरबसल्या विविध माध्यमांतून प्रचारसभा बघत असतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण बघायला मिळाले आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते नितीन गडकरी, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील सभा होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -