मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना; ठाकरे सरकारला लागलं ग्रहण

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना; ठाकरे सरकारला लागलं ग्रहण

महाराष्ट्र शासनातील २ लाख पदे रिक्त

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महा विकास आघाडीचे सरकार बनून होऊन महिना होत आला, मात्र अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या सरकारवर राज्यातील नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. मात्र, या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठीच मुहूर्त मिळत नसल्याची गोष्ट समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला ग्रहण लागलं असल्याची चर्चा  राजकीय वर्तुळात सुरु आहे.


हेही वाचा – अमृता माझं ऐकतीलच असं नाही – देवेंद्र फडणवीस


२७ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार 

हिवाळी अधिवेशनानंतर लगेच दोन दिवसांनी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा सुरु होती. आज सकाळपासून उद्या म्हणजे मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी चर्चा सुरु होती. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १०-१० कॅबिनेट तर दोन्ही पक्षाचे प्रत्येकी ३ राज्यमंत्री आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, हा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच्या ऐवजी थेट शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


हेही वाचा – NRC वरुन सरकार गोंधळ निर्माण करतय – पवार


 

मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे. आता फक्त काँग्रेसच्या हायकमांड काय निर्णय घेते, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मात्र, दिल्लीत काँग्रेस पक्षाकडून मोठे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात राज्यातील काँग्रेस नेते देखील सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणे सध्या शक्य नाही. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला गेला असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवारांचा काँग्रेसला टोला

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरुन आज शरद पवार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ‘मंत्रीमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादीला तयारी करावी लागत नाही. आम्हाला परवानगी घ्यायला कुठे जावे लागत नाही’, असा टोला त्यांनी लगावला.

First Published on: December 23, 2019 8:53 PM
Exit mobile version